१२४ नागरिकांना दंड करुन दिले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST2021-01-08T04:19:25+5:302021-01-08T04:19:25+5:30

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १२४ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ...

Masks fined 124 citizens | १२४ नागरिकांना दंड करुन दिले मास्क

१२४ नागरिकांना दंड करुन दिले मास्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १२४ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात पथकांनी २६६५८ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी १६ लाख ८८ हजाराचा दंड वसूल केला आहे. शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १९, धरमपेठ २६, हनुमाननगर ६, धंतोली ५, नेहरुनगर ६, गांधीबाग ९, सतरंजीपुरा ६, लकडगंज १२, आशीनगर १२, मंगळवारी २० आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत २११८८ नागरिकांकडून १ कोटी ५ लाख ९४ हजार वसूल केले.

Web Title: Masks fined 124 citizens