शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरवर एक वर्ष जीएसटी आकारू नये : कॅमिटची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:32 IST

सध्या आवश्यक सर्जिकल मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरवरील जीएसटी एक वर्षासाठी रद्द करून, ग्राहकांना फायदा देण्याची मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ऑफ ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे केली आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांना फायदा द्यावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या असून, त्याचा फायदा व्यापारी आणि उद्योजकांना मिळणार आहे. त्याप्रमाणे सध्या आवश्यक सर्जिकल मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरवरील जीएसटी एक वर्षासाठी रद्द करून, ग्राहकांना फायदा देण्याची मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ऑफ ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे केली आहे.कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वांनाच मास्क आणि सॅनिटायझरची गरज आहे. केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचे दर निश्चित केले असून, त्यापेक्षा जास्त दरात ग्राहकांना विकता येणार नाही. मास्कवर ५ टक्के तर सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी आहे. पण जीएसटी कायमच दूर करून ग्राहकांना दिलासा देण्याची ही वेळ आहे. सरकारने २०० मिली सॅनिटायझरची किंमत १०० रुपये आणि दोन प्लाय आणि तीन प्लाय मास्कची किंमत अनुक्रमे ८ आणि १० रुपये ठरविली आहे. या वस्तू निश्चित दरात विकण्यासाठी फार्मसिस्टवर दबाव आणण्यात येत आहे. फार्मसिस्टकडे पूर्वीच जास्त किमतीचा माल असताना, कमी किमतीचा माल विकण्यास त्यांनी अप्रत्यक्ष नकारच दिला आहे. सरकारने १८ टक्के जीएसटी रद्द केल्यास किंमत १८ रुपयांनी किंमत कमी होणार आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे अग्रवाल म्हणाले.सरकार एकीकडे कमी दरातील मास्क आणि सॅनिटायझर विकण्यास दबाव टाकत आहे, तर दुसरीकडे जीएसटी रद्द करण्याचे अधिकार सरकारकडे असताना त्यावर अंमलबजावणी करण्यास तयार नाही. यातून चांगला संदेश जात नाही. सरकारने आधी जीएसटी शून्य करायला पाहिजे होती, त्यानंतरच किमती कमी करण्यास सांगायला हवे होते. उत्पादन स्वस्त आणि सुलभ व्हावे, असे सरकारला वाटत असेल तर आपली कमाई सोडायला हवी. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठविले असून, या दोन वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केल्याचे अग्रवाल म्हणाले.सध्या दोन्ही आवश्यक वस्तूंसाठी अस्थायी धोरण बनविण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये सरकार मास्क आणि सॅनिटायझर मोफत वाटप करीत आहेत. भारत सरकारनेही हे धोरण अवलंब करण्याची गरज आहे. अनेक उद्योजक सॅनिटायझरचे उत्पादन करण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांना आवश्यक परवाने तातडीने द्यावेत. यामुळे दोन्ही उत्पादनांची निर्मिती वाढेल आणि लघु व मध्यम उद्योगांना बूस्ट मिळेल, असे दीपेन अग्रवाल म्हणाले.

टॅग्स :GSTजीएसटीnagpurनागपूर