‘आदिवासींसाठी विशेष सुरक्षा कायदा करावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:25 AM2019-11-16T05:25:22+5:302019-11-16T05:25:26+5:30

आदिवासींसाठी विशेष आर्थिक व सामाजिक सुरक्षा कायदा तयार करावा, वन अधिकार कायद्याचे शंभर टक्के पालन व्हावे

'Make a special protection law for tribals' | ‘आदिवासींसाठी विशेष सुरक्षा कायदा करावा’

‘आदिवासींसाठी विशेष सुरक्षा कायदा करावा’

Next

नागपूर : आदिवासींसाठी विशेष आर्थिक व सामाजिक सुरक्षा कायदा तयार करावा, वन अधिकार कायद्याचे शंभर टक्के पालन व्हावे, तसेच नागपूरमध्ये २५ एकर जमीन देऊन गोंडवाना संग्रहालय उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शुक्रवारी मेकोसाबाग स्कूल मैदान, कडबी चौक येथे आयोजित आदिवासी शिक्षा व अधिकार परिषद, आदिवासी जनसंसदेत ते बोलत होते. परिषदेला आ. अनिल देशमुख, आ. नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री रमेश बंग, सतीश चतुर्वेदी, राजेंद्र मुळक, धर्मरावबाबा आत्राम, आ.प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, आ.इंद्रनील नाईक, आदिवासी बचाओ आंदोलन बिरसा बिग्रेडचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, अनेक क्षेत्रात आदिवासी मागे राहिले आहेत. गरिबी रेषेखाली सर्वात जास्त आदिवासी आहेत. देशाचा विकास झाला पण आदिवासी मागेच राहिले. या समाजात आता जागृती निर्माण केली पाहिजे.
>आदिवासी मुलींशी साधला संवाद
परिषदेपूर्वी शरद पवार यांनी देशभरातून आलेल्या आदिवासी मुलींशी संवाद साधला. बहुतांश मुली इंजिनिअर, एमए, बी,एड. अशा उच्चशिक्षित होत्या. या मुलींशी संवाद साधताना पवार म्हणाले, आपल्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक मुली पदवीधर आहेत. नव्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व समजले आहे, हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे.

Web Title: 'Make a special protection law for tribals'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.