शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Maharashtra Assembly Election 2019 : संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:34 PM

संविधानाचे रक्षणकर्ता एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी यशोधरानगर येथील जाहीर सभेत केले.

ठळक मुद्देयशोधरानगर, सिद्धार्थनगर येथील सभेत आवाहन 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रात असो की राज्यात भारतीय जनता पक्षाने संविधानाचे वेळोवेळी उल्लंघन केले आहे. संविधानाचे रक्षणकर्ता एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी यशोधरानगर येथील जाहीर सभेत केले.ते म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत उत्तर नागपूर अजूनही मागास आहे. निव्वळ आश्वासनांच्या जोरावर भाजपाने उत्तर नागपुरात बाजी मारली. पण गेल्या पाच वर्षात दिलेली आश्वासने पुरती पोकळ ठरली. उत्तर नागपूरच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने विकास फक्त काँग्रेसच करू शकते, असा दावाही त्यांनी केला. शुक्रवारी डॉ. राऊत यांच्या यशोधरानगर, संघर्षनगर, बाळाभाऊ पेठ, सिद्धार्थनगर, दीक्षितनगर, शेंडेनगर आदी ठिकाणी जाहीर सभा झाल्या. दरम्यान, सकाळी विविध वस्त्यांमध्ये पदयात्राद्वारे त्यांनी जनसंपर्क साधला. यात ते म्हणाले की, काँग्रेसच्या काळात जनतेला महागाईचे चटके भेडसावले नाही. पेट्रोलच्या किमती काँग्रेसच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या नाही. आज समाज बेरोजगारीच्या झळा सोसत आहे. तरुणांच्या हाताला नोकरी नाही, उद्योगधंदे बंद पडत आहे. मंदीचे सावट या देशावर पसरले आहे. विविध करांच्या नावावर जनतेला लुटले जात आहे. सामान्य जनतेला लुटणाऱ्या भाजपाला थांबविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले. दरम्यान, उत्तर नागपुरातील जगत सेलिब्रेशन हॉलमध्ये काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला नितीन राऊत यांच्यासोबत माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश उपाध्यक्ष जिया पटेल, प्रवक्ता संजय दुबे, बंडोपंत टेंभुर्णे, नगरसेवक दिनेश यादव, क्षितिज अड्याळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Rautनितीन राऊतnagpur-north-acनागपूर उत्तर