शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांच्या रोजगारासाठी मी वचनबद्ध : प्रमोद मानमोडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 01:03 IST

सरकारच्या रोजगाराच्या योजना कुचकामी ठरल्या असतानाही आपण सात हजार लोकांना रोजगार दिला. रोजगारासाठी नेहमीच तत्पर राहिलो आहे. पुढेही राहणार आहे, असे वचन अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांना दिले.

ठळक मुद्देपदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : आज ‘बाईक रॅली’

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ चंद्रमणी नगरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक क्षेत्रात मी नेहमीच अग्रेसर राहिलो. सरकारच्या रोजगाराच्या योजना कुचकामी ठरल्या असतानाही आपण सात हजार लोकांना रोजगार दिला. रोजगारासाठी नेहमीच तत्पर राहिलो आहे. पुढेही राहणार आहे, असे वचन मानमोडे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांना दिले.चंद्रमणीनगर, कुकडे-लेआऊट, एम्प्रेस मिल्स कॉलनी, शामनगर, स्वराज कॉलनी, जोशीवाडी, जयवंतनगर, त्रिशरण चौक, कुशीनगर, वसंतनगर, नवीन कैलासनगर, श्रमजीवीनगर, विश्वकर्मानगर आणि बाभुळखेडा भागातून पदयात्रेद्वारे मानमोडे यांनी जनसंपर्क साधला. अनेक ठिकाणी मतदारांनी त्यांचे पुष्पहारांनी स्वागत केले. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात युवा मतदार, महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी माजी महापौर पांडुरंग हिवरकर, माजी नगरसेवक अनिल वाघमारे, नत्थूजी मानमोडे, गौरव मानमोडे, शकील पटेल, मंजूर अन्सारी, इसाक मन्सुरी, बापू मानकर, विनायक गवडी, किशोर कावळे, विनोद वाघमारे, सुधाकर बांते, कुमूद शेवाळे, महेंद्रसिंग ठाकूर, विलास गावंडे, योगेश मतलाने, विकास नारायणे, अमित लाखे, अफजल शेख, अनिस लीडर, चित्रा थूल, रुपाली थूल, बेबीनंदा थूल, सविता थूल, वर्षा कुथे, प्रतिभा पाटील, मुन्नी यादव, अमृता वाडे, प्रगती नगराळे, शुभांगी साव, चित्रा वनवे, शोभाताई सोळंके, गोरखनाथ सोळंके, ज्योती कोदे, ताराचंद लोखंडे, शाबाज खान, नरेश नायडू, मनोज फाले, विजय पाटील, प्रमोद गावंडे, देवेंद्र घोरपडे, विठ्ठलराव गावंडे, जरीना खान, रेहाना सय्यद, शबाना शेख, नाजमा शेख, जुनेद शेख, किशोर दिकोंडवार, शाहरुख शेख, रेहान शेख, गगन गजभिये, अर्शद शेख, ज्ञानेश्वर ढेपे, हरीदास गजभिये, बागडताबाई घंगारे, फुलवंताबाई मंडपे, भागीरथाबाई रंगारी, विकास नारायणे आदींसह ५०० वर मानमोडे समर्थक सहभागी झाले होते. रविवारी १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नंदनवन येथील प्रचार कार्यालयातून ही बाईक रॅली निघणार आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिण