शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : झेंडे, बॅनर, बिल्ले व दुपट्ट्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:56 IST

विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे नऊ दिवस उरल्याने प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहे.

ठळक मुद्देरणधुमाळी : नऊ दिवस उरल्याने प्रचाराला वेग : प्रचार साहित्याची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठलीही निवडणूक म्हटली की विविध राजकीय पक्षातील उमेदवारांचा प्रचार आणि प्रसारावर जोर असतो, तेवढाच प्रचार साहित्यावर सुद्धा असतो. विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे नऊ दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला आहे. बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमातून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहे. 

प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांसाठी राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक, बॅनर उपलब्ध केले जात आहे. आपापल्या पक्षाच्या किंवा सहकारी पक्षाच्या उमेदवारांना आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पक्षीय कार्यालयांमार्फत होत आहे.शहरातील सर्व उमेदवारांसाठीचे पक्षीय प्रचार साहित्य हे पक्षाकडून वितरित केले जात आहे. काही पक्षाच्या उमेदवारांना पक्ष कार्यालयातून तर काहींना थेट उपलब्ध केले जात आहे. मतदार याद्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदारयाद्यांचे नियोजन करून प्रत्यक्ष मतदानासाठीच्या बूथनिहाय जबाबदाºया निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.उमेदवारांचा स्वत:च्याही साहित्यावर खर्चप्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु साहित्याची कमतरता भासू नये यासाठी काही उमेदवारांनी स्वत: खर्च करून साहित्याची जुळवाजुळव केली आहे. अपक्ष व छोट्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचार साहित्यावर स्वत: खर्च करावा लागत आहे. मतदार आकर्षित होईल, अशा साहित्याची मागणी अधिक आहे.प्रचार साहित्य थेट उमेदवारांकडेकाँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पक्षातर्फे झेंडे, बॅनर, जाहीरनामे, बिल्ले व दुपट्टे असे प्रचार साहित्य उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रचाराचे साहित्य शहर काँग्रेसच्या कार्यालयाकडे न पाठविता थेट उमेदवारांना पाठविले जात आहे. त्यामुळे प्रचार साहित्य वाटपाचा घोळ निर्माण होणार नाही. साहित्य कमी मिळाले वा मिळाले नाही, अशी ओरड होणार नाही.डॉ. गजराज हटेवार, शहर काँग्रेसचे प्रधान महासचिवप्रदेश कार्यालयाकडून साहित्य उपलब्धविधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. प्रदेश कार्यालयाकडून नागपूर येथील पक्ष कार्यालयाला प्रचार साहित्य पाठविण्यात आले आहे. विधानसभा संघनिहाय या साहित्याचे वितरण सुरू आहे. मागणीनुसार साहित्य उपलब्ध केले जात आहे.आ. गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ते भाजपा

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019