नागपूर जिल्ह्यातील कोराडीचे प्रस्तावित वीज संच विदर्भाबाहेर उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 08:08 PM2020-04-06T20:08:03+5:302020-04-06T20:09:09+5:30

विदर्भात आता पुन्हा प्रदूषण नको. त्यामुळे हे संच विदर्भाबाहेर उभारा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आहे.

Koradi's proposed power set in Nagpur district emerged outside Vidarbha | नागपूर जिल्ह्यातील कोराडीचे प्रस्तावित वीज संच विदर्भाबाहेर उभारा

नागपूर जिल्ह्यातील कोराडीचे प्रस्तावित वीज संच विदर्भाबाहेर उभारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी येथे प्रत्येकी ६२० मेगावॅटचे २ संच (एकूण १ हजार २४० मेगावॅट) कोराडी येथे स्थापित करण्याची घोषणा वीज मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. यातून ५ हजार रोजगार निर्मिती होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र विदर्भात आता पुन्हा प्रदूषण नको. त्यामुळे हे संच विदर्भाबाहेर उभारा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आहे.
वीज मंत्र्यांच्या या घोषणेला विदर्भ राज्य आंदोलन समितीने विरोध के ला असून ही विदर्भाच्या जनतेची दिशाभूल असल्याचे म्हटले आहे. १९५६ पासून विदर्भ महाराष्ट्राचा एक भाग असून तो वीज निर्माण करणारा मुख्य प्रदेश आहे. मात्र वीज निर्मितीमधून १९५६ पासून विदर्भाला प्रदूषणच मिळाले आहे. यातून विदर्भात रोजगार निर्माण झाल्याचा दावाही खोटा असून अनेक नोकऱ्या विदर्भाबाहेरील लोकांनी बळकावल्या आहेत. याउलट येथील युवक मुंबई-पुण्यात नोकºया शोधत आहेत. या नव्या संचातून होणारी वीज निर्मिती व नोकºया फक्त विदभार्साठी राहणार नाहीत. कारण तशी घोषणा मंत्र्यानी केलेली नाही. विदर्भातील या वीज प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे अनेक आजार वाढले आहेत. त्यामुळे हे प्रस्तावित वीज संच विदर्भाबाहेर कोणत्याही प्रदेशात उभारावे, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचा कोराडीतील प्रस्तावित संचाच्या उभारणीला आधीपासूनच विरोध आहे. विदर्भात विजेचे उत्पादन वाढविण्याऐवजी कोराडी-चंद्रपूर पट्ट्यामधील प्रदूषण कमी करण्यासाठी वीज उत्पादन विदभार्बाहेर स्थानांतरित करावे व विदर्भाला प्रदूषणमुक्त करावे. तसेच विदर्भातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊन त्यावरील दर निम्मे करावे. स्थिर आकार, वीज वहनकर आदी संपवावे. अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा उतरावे लागेल, असा इशारा मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिला आहे.

Web Title: Koradi's proposed power set in Nagpur district emerged outside Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज