शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हायप्रोफाईल डेटिंगचे कोलकाता कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:20 IST

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिताली, स्विटी असो वा नीलम. हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणाºया कंपन्यांच्या कॉल सेंटरवरील तरुणी तुमच्याशी गोड बोलून मैत्री वाढविते. एकदा का कुणी त्यांच्या जाळ्यात अडकला की तो खिसा रिकामा होईपर्यंत बाहेर पडत नाही. लोकमतने केलेल्या तपासात नागपुरातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसाचे कोलकाता कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे.कॉल सेंटरवरील ...

ठळक मुद्देम्हणे डेटिंगला सरकारची मान्यता : कॉल सेंटरची नागपूरवर वक्रदृष्टी

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिताली, स्विटी असो वा नीलम. हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालविणाºया कंपन्यांच्या कॉल सेंटरवरील तरुणी तुमच्याशी गोड बोलून मैत्री वाढविते. एकदा का कुणी त्यांच्या जाळ्यात अडकला की तो खिसा रिकामा होईपर्यंत बाहेर पडत नाही. लोकमतने केलेल्या तपासात नागपुरातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसाचे कोलकाता कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे.कॉल सेंटरवरील तरुणी त्यांनी सांगितलेल्या पॅकेजनुसार तुम्ही या व्यवसायात काम करण्यासाठी किंवा डेटींगची सेवा घेण्यासाठी इच्छुक असल्याचा विश्वास बसल्यावर तुम्हाला कंपनीची कार्यपद्धती समजावून सांगते. प्रस्तुत प्रतिनिधीने ‘टेक्नो इमर्ज’ या फोनो फ्रेंड कंपनीच्या कॉल सेंटवर काम करणाºया नीलम आणि बिशा तरुणीकडे या व्यवसायात काम करण्याची इच्छा दर्शविली असता त्यांनी तब्बल दोन दिवसाच्या संवादानंतर कंपनीच्या सर्व कार्यपद्धतीची माहिती दिली.यात ‘टेक्नो इमर्ज’ या कंपनीला सरकारची मान्यता असून दरवर्षी इनकम टॅक्स भरण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे या व्यवसायात काम करताना कोणतीही रिस्क नाही. तुमची कुठेही चिटिंग होणार नाही वा आपल्याला पोलीसही पकडणार नाही, असा विश्वास दिलाकारण या व्यवसायात केवळ हायप्रोफाईल नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. तुम्ही जर हायप्रोफाईल (गर्भश्रीमंत) महिलेकडे सेवा देण्यासाठी गेले असता तुमचा सर्व खर्च आणि सुरक्षिततेची जबाबदारी ती घेते. सेवा देणारा किंवा सेवा घेणारा हे दोन्ही कंपनीच्या आयव्हीआर सिस्टीमने दिलेल्या कोडचे पालन करीत असतात. त्यामुळे या व्यवसायात कोणताही रिस्क फॅक्टर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस आणि सरकारचा अशा कंपन्यावर कोणताही वचक नसल्याने या कंपन्याचे धाडस वाढले , हे मात्र नक्की.या अकाऊंटवर होतात व्यवहार‘टेक्नो इमर्ज’ कंपनीच्या जोधपूर पार्क, कोलकाता येथील स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) खाते क्रमांक ३६५७६५६७६०३ आणि आयएफएससी कोड क्रमांक एसबीइन ००११५३९ यावर चालतात.लोकमतची भूमिकागोड बोलून शेकडो तरुण-तरुणींना हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकविणाºया अशा लोकांना समाजाने धडा शिकविणे आवश्यक आहे. पोलीस आणि प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी या कंपन्या सातत्याने बदलवित असलेली नावे आणि कार्यालयांची स्थळे यामुळे पोलिसांच्या हाती लागत नाही. मात्र या कंपन्यांच्या कार्यपद्धती समजून त्यांना पकडणे हे आता पोलिसांच्या सायबर विभागापुढे आव्हान आहे. मितालीच्या जाळ्यात अडकलेल्या नागपुरातील एका निवृत्त अभियंत्याने हा व्यवसाय उजेडात आणला. मात्र जे तरुण-तरुणी या व्यवसायात अडकले आहेत किंवा ज्या सूज्ञ पालकांना याची कुणकुण लागली आहे त्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे आहेत कॉल सेंटरचे नंबरनागपुरात ज्या स्त्री आणि पुरुषांना ‘टेक्नो इमर्ज’ या कंपनीच्या कॉल सेंटरवरून कॉल येतात ते मोबाईल क्रमांक ९०७३९१५६२४, ९०७३९१५६२०, ९०७३९१५६२७ असे आहेत. यावरून प्रामुख्याने बिशा, नीलम आणि स्विटी नावाच्या तरुणी संवाद साधतात. मात्र यातील एक नंबर रविवारी बंद होता.