शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कर्म तसे फळ ! चोरट्याच्या हातून पुन्हा फोन चोरीला; गुन्हा कसा नोंदवावा ? पोलिसांनाही पडला प्रश्न

By नरेश डोंगरे | Updated: April 18, 2026 19:13 IST

Nagpur : मौज मस्ती करून परतणाऱ्या एका चोरट्याला रेड लाईट एरियात दोन भामट्यांनी बेदम चोप देऊन लुटले. विशेष म्हणजे, या चोरट्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्यानेच 'हम तो लूट गये, भरे बाजार मे', अशी कैफियत पोलिसांना ऐकवली.

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मौज मस्ती करून परतणाऱ्या एका चोरट्याला रेड लाईट एरियात दोन भामट्यांनी बेदम चोप देऊन लुटले. विशेष म्हणजे, या चोरट्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्यानेच 'हम तो लूट गये, भरे बाजार मे', अशी कैफियत पोलिसांना ऐकवली. त्यामुळे काही वेळेसाठी पोलीसही बुचकळ्यात पडले.

ही मासले वाईक घटना इतवारी रेल्वे स्थानक ते गंगा जमुना परिसरातील आहे. बालाघाट येथील अभियंता, कुणाल (नाव काल्पनिक) शुक्रवारी १७ एप्रिलला सायंकाळी इतवारी रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेथे बुकिंग काउंटर समोर त्याला एका ज्येष्ठ नागरिकांनी रिझर्वेशन फॉर्म भरून देण्याची विनंती केली. त्यानुसार कुणालने 'बाबा'जी चा फॉर्म भरून देण्याला सुरुवात केली. या वेळेत आपला महागडा मोबाईल चार्ज करून घ्यावा म्हणून कुणालने तो बाजूच्याच चार्जिंग बोर्डवर लावला.

दरम्यान, सावज शोधत असलेल्या चोरट्याची या आकर्षक आणि महागड्या मोबाईलवर नजर गेली आणि अभियंत्याचे काही क्षणासाठी दुर्लक्ष होताच त्याने तो मोबाईल लंपास केला. दरम्यान, रिझर्वेशन फॉर्म भरून झाल्यानंतर कुणाल मोबाईल घेण्यासाठी वळला असता त्याला तेथे मोबाईल आढळला नाही. हा मोबाईल त्याच्या ॲपल वॉचला कनेक्ट होता. कुणाल स्वतः टेक्नोसेवी असल्याने त्याने त्या माध्यमातून मोबाईल पळविणाऱ्या चोरट्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. दोन तास प्रयत्न करूनही चोरटा गवसत नसल्यामुळे त्याने जीआरपी ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार नीलम डोंगरे आणि सहकाऱ्यांनी लगेच रेल्वे सुरक्षा दलाच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूम मध्ये जाऊन पाहणी केली. तेव्हा एक चोरटा हा मोबाईल घेऊन थेट रेडलाईट एरिया अर्थात गंगा जमुना परिसरात दिसून आला. त्यानुसार रेल्वे पोलिसांचे पथक तिकडे धावले.

रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत शोधाशोध केल्यानंतर सीसीटीव्हीतील संशयित पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलीस ठाण्यात आनल्यानंतर 'बाजीराव'चा प्रसाद देण्यात आला. दोन फटक्यात चोरट्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. मात्र, गंगा जमुनातील एका वारंगणेकडे हा मोबाईल विसरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस त्याला घेऊन पुन्हा रेडलाइट एरियात गेले. मध्यरात्रीपर्यंत शोधाशोध करूनही तो त्या वारांगणेचे ठिकाण सांगू शकला नाही. तो बनवाबनवी करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणून त्याची खातरदारी करण्यात आली. यावेळी त्यांने गंगाजमुनातून बाहेर पडताना स्कूटरवर आलेल्या दोघांनी आपल्याला मारहाण केली आणि मोबाईल हिसकावून नेल्याचे सांगितले. 

कहानीत ट्विस्ट, पोलीस संभ्रमात !

चोरटा खरा बोलतो की खोटा हे तपासण्यासाठी रेल्वे पोलिसांनी त्या भागात जाऊन पुन्हा सीसीटीव्ही चेक केले. यावेळी रेडलाईट एरियात या मोबाईल चोरट्याला दोन भामट्यांनी बेदम चोप देऊन त्याच्या जवळचा मोबाईल हिसकावून नेताना दिसून आले.  चोरीच्या प्रकरणात असा ट्विस्ट आल्यामुळे पोलिस संभ्रमात सापडले आहेत. ज्या चोरट्याला पोलिसांनी अटक करण्यासाठी पकडले, त्या चोरट्याची तक्रार नोंदवून घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

आता काय करायचे !

एकाच चोरीच्या घटनेत दोन गुन्हे घडल्याने, आता कसे करावे, असा प्रश्न खुद्द पोलिसांना पडला आहे. यासंबंधी पोलीस विधी अधिकाऱ्यांकडून माहिती वजा सल्ला घेत आहेत. दुसरीकडे लूटमार करणाऱ्या त्या दोन भामट्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Karma! Thief Robbed Again; Police Puzzled on How to Register Case

Web Summary : A thief, after stealing a phone, was robbed himself! Police investigating the initial theft are now faced with registering the thief's complaint. The bizarre incident has left Nagpur police in a quandary, seeking legal advice.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर