शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक प्रशिक्षणाचा पत्रकारिता अभ्यासक्रमात समावेश असावा

By admin | Updated: August 24, 2016 03:01 IST

पत्रकारितेच्या क्षेत्रातील दगदग फार वाढली आहे. त्यामुळे पत्रकारांनी शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ राहण्याची आवश्यकता आहे.

सच्चिदानंद जोशी : नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या ‘कॅम्पस’ पत्रिकेचे प्रकाशननागपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रातील दगदग फार वाढली आहे. त्यामुळे पत्रकारांनी शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ राहण्याची आवश्यकता आहे. या मुद्यांवर आधारित प्रशिक्षणाचा पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे मत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ‘कॅम्पस’ या पत्रिकेचे मंगळवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.पत्रकार जे काही म्हणतात किंवा लिहितात त्याचा समाजावर प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी अध्यात्माची मौलिक मदत होऊ शकते. अध्यात्माला कुठल्याही धर्माशी जोडणे योग्य नाही, असे प्रतिपादन डॉ.जोशी यांनी केले. पत्रकारितेमध्ये धावपळ वाढली आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या व्यायामाच्या माध्यमातून पत्रकारांनी ‘फिटनेस’कडे लक्ष दिले पाहिजे. सोबतच या क्षेत्रात मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात राहतो. अशा वेळी डोके शांत ठेवून संतुलित बातमी देण्यासाठी बौद्धिक सुदृढता आवश्यक आहे. तरुण पत्रकारांनी सुरुवातीपासूनच या तिन्ही बाबींवर भर दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चांगला पत्रकार बनण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असते असेदेखील ते म्हणाले.विभागप्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी यावेळी प्रास्ताविकातून ‘कॅम्पस’बाबत माहिती दिली. अंकिता देशकर व वनश्री पांढरे या विद्यार्थिनींनी ‘कॅम्पस’च्या निर्मितीबाबत अनुभव सांगितले. छवी शेजवलकर हिने संचालन केले तर कोनिका मिगलानी हिने आभार मानले. यावेळी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.मोईज हक व ‘ई-लर्निंग’तज्ज्ञ आनंद भिसे हेदेखील उपस्थित होते. ‘कॅम्पस’मध्ये विभागातील ‘बीजे’ व ‘एमए’ या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे लेख, कविता, छायाचित्रे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)