शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

संस्था लावून देणार मुलीचे लग्न

By admin | Updated: May 20, 2016 02:38 IST

दुष्काळामुळे मुलीचे लग्न करण्यास असहाय्य ठरलेले मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हरिभाऊ बाबुराव लोहार हे पैशाची जमवाजमव करण्यासाठी नागपुरात भटकंती करीत आहेत.

नागपूरकरांचे सरसावले हात : हरिभाऊला मदतही करणार नागपूर : दुष्काळामुळे मुलीचे लग्न करण्यास असहाय्य ठरलेले मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हरिभाऊ बाबुराव लोहार हे पैशाची जमवाजमव करण्यासाठी नागपुरात भटकंती करीत आहेत. हरिभाऊची व्यथा लोकमतने समाजापुढे मांडली आणि सहृदयी नागपूरकरांनी हरिभाऊच्या मदतीसाठी हात पुढे केले. सकाळपासून हरिभाऊचा पत्ता विचारण्यासाठी लोकमतच्या कार्यालयात अनेकांचे फोन येत आहेत. काही संस्थांनी पत्रक पाठवून हरिभाऊच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आहे. मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाने अनेकांचे जगणेच विस्कळीत केले आहे. आयुष्यभर सन्मानाने जगलेल्या हरिभाऊवरही मुलीच्या लग्नाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. हरिभाऊ नागपुरात तुणतुणं घेऊन दारोदारी भटकून पै-पै जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. ७१ वर्षाच्या या वृद्धाची होत असलेली ससेहोलपट लोकमतने मांडल्यानंतर अनेकांनी त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते, सेवादल शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत कार्यकर्त्यांनी मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली. राजमाता जिजाऊ वैदर्भीय मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी स्वत: मदतीसाठी लोकमत कार्यालयात भेट दिली. संघर्ष वाहिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हरिभाऊच्या मदतीसाठी आवाहन केले. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीकडून विचारणा झाली. काहीचे वैयक्तिक फोन सुद्धा हरिभाऊच्या मदतीसाठी आले. लोहार समाज बांधव सुद्धा त्याच्या मदतीसाठी सरसावले. (प्रतिनिधी)हरिभाऊची शोधाशोधहरिभाऊ बुधवारी झिरो माईल येथे तुणतुणं वाजवित दारोदारी फिरत होता. संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे यांनी हरिभाऊची संपूर्ण माहिती घेतली. त्याच्या घरचा पत्ता घेऊन, स्थानिक संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी त्याची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर हरिभाऊ तेथून निघून गेला. गुरुवारी हरिभाऊची बातमी प्रकाशित झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी त्याची शोधाशोध सुरू आहे.