६८ प्रतिष्ठानांची तपासणी; ९५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST2021-04-20T04:07:48+5:302021-04-20T04:07:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी सोमवारी १२ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई ...

Inspection of 68 establishments; A fine of Rs 95,000 | ६८ प्रतिष्ठानांची तपासणी; ९५ हजारांचा दंड

६८ प्रतिष्ठानांची तपासणी; ९५ हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी सोमवारी १२ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई करून ९५ हजारांचा दंड वसूल केला. पथकांनी दिवसभरात ६८ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली. लक्ष्मीनगर झोनमध्ये सात प्रतिष्ठानांवर कारवाई करून दहा हजार दंड केला. धरमपेठ झोनमध्ये सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार दंड केला. हनुमानगरमध्ये दोन प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. धंतोली झोनमध्ये सात प्रतिष्ठानांची तपासणी केली. नेहरूनगरच्या पथकाने सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार, गांधीबाग झोनमध्ये दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी केली. आसीनगरमध्ये १३ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार, लकडगंज झोनमध्ये १७ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार दंड केला, तर मंगळवारी झोनमध्ये ४ प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Inspection of 68 establishments; A fine of Rs 95,000