शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत पाठ्यपुस्तकांमधील इतिहास बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 02:53 IST

आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्य पुस्तकांमध्येच चुकीचा व भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे.

सुब्रमण्यम् स्वामी : महर्षी नारद जयंतीनिमित्त पत्रकार पुरस्कारांचे वितरणनागपूर : आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्य पुस्तकांमध्येच चुकीचा व भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे. हा इतिहास बदलविण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार असून येत्या दोन वर्षांत इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलण्यात येतील, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केले. महर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्राच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे.नंदकुमार, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित व विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर पाठक उपस्थित होते. आपल्या देशात अगदी आर्य काळापासूनचा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. देशात अनेक शूरवीर होऊन गेले. हिंदूंनी गेल्या हजारो वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष केला असताना मुघलांच्या इतिहासाचे धडेच्या धडे आहेत. हे अयोग्य असून यात बदल होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. मुळात नोकरीसाठी पत्रकारितेची पदवी ही अट ठेवायलाच हवी आणि कायद्याबाबत त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे असे डॉ.स्वामी म्हणाले. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. परंतु चित्रपट आणि मालिकांमधून त्यांची प्रतिमा विनोदात्मक पद्धतीची करण्यात आली. काही लोकांनी जाणुनबुजून असे केले असा आरोप जे.नंदकुमार यांनी लावला. यावेळी बबन वाळके आणि जयेश जग्गड यांना पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय विश्व संवाद केंद्राचे सहप्रमुख प्रसाद बर्वे यांनी लिहिलेल्या ‘देवर्षी नारद : जीवन आणि कार्य’ या पुस्तकाचेदेखील प्रकाशन करण्यात आले. सुधीर पाठक यांनी प्रास्ताविक केले. नीलय चौथाईवाले यांनी संचालन केले तर प्रसाद बर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)