शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गॅससाठी अर्धा किलोमीटर लांब रांगा; संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:25 IST

Nagpur : राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच आता सामान्य जनतेला गॅस सिलिंडरसाठीही पायपीट करावी लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरात आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.

नागपूर : राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच आता सामान्य जनतेला गॅस सिलिंडरसाठीही पायपीट करावी लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरात आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. येथील एचपी (HP) गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच नागरिकांनी सिलिंडरसाठी मोठी गर्दी केली होती. ही रांग तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत लांब गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.

​नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वानाडोंगरी येथील एचपी गॅस एजन्सीसमोर पहाटे ३-४ वाजेपासूनच नागरिक रिकामे सिलिंडर घेऊन उभे होते. मात्र, दुपारचे ऊन वाढूनही गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त झालेल्या नागरिकांनी एजन्सीसमोरचा रस्ता रोखून धरला आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

​गर्दीचे मुख्य कारण 'KYC'?

सध्या गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी 'ई-केवायसी' (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचे केवायसी पूर्ण झालेले नाही, त्यांना बुकिंग असूनही सिलिंडर मिळण्यास अडचणी येत आहेत. तांत्रिक प्रक्रियेतील विलंब आणि एजन्सीकडून होणारा अपुरा पुरवठा यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे.

​नागरिकांचे हाल

दुपारच्या रणरणत्या उन्हात वृद्ध, महिला आणि कामगार वर्गाला तासनतास उभे राहावे लागत आहे. बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नाही आणि केवायसीच्या नावाखाली आम्हाला चकरा मारायला लावल्या जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली. ​या गोंधळामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Residents Block Road Amid Gas Cylinder Shortage Frustration

Web Summary : Nagpur residents faced severe gas cylinder shortages, queuing for half a kilometer. Frustrated by e-KYC issues and supply delays, they blocked the road, protesting against administrative inaction amidst rising temperatures and disrupted traffic.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईnagpurनागपूरCylinderगॅस सिलेंडरWarयुद्ध