शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांना भूलथापा नको, आता बदल हवा आहे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

नागपूर : पदवीधर मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, एवढ्या वर्षात पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट रोजगार, ...

नागपूर : पदवीधर मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, एवढ्या वर्षात पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट रोजगार, नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे पदवीधरांना आता भूलथापा नको तर बदल हवा आहे, असे मत ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पीरिपा (कवाडे गट), आरपीआय (गवई गट) आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्यासाठी नागपुरातील पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात सभा घेण्‍यात आली. या सभेला ऊर्जामंत्री व नागपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर प्रसन्‍न तिडके, हरीश भाकरू, मोहन वासनिक, पांडे आदी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्‍या पदवीधरांच्‍या समस्‍या सोडवून त्‍यांच्‍या आयुष्‍यात परिवर्तन घडवून आणणे, प्रत्‍येक क्षेत्रातील पदवीधराला उज्‍ज्‍वल भविष्‍य देणे, कौशल्‍य विकासासोबत त्‍याला रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करून देणे, हा आता एकच ध्‍यास आहे. शिक्षक, कर्मचारी, प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यांच्‍या आयुष्‍यात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर पदवीधर मतदार संघातही परिवर्तनाची नितांत गरज आहे आणि हे परिवर्तन घडवून आणण्‍याचा एकमेव मार्ग म्‍हणजे पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे, असे ॲड. अभिजीत वंजारी म्‍हणाले.

चौकट...

काँग्रेसचा ग्राफ वाढतोय : आ. विकास ठाकरे

काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्षांची बैठक घेतली. नागपूर शहरात मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहता काँग्रेसची मते वाढत गेल्याचे दिसते. यावेळीही वंजारी यांच्यामागे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने उभा असून शहरात काँग्रेसचा ग्राफ वाढलेला दिसेल, असा विश्वास आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.