शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या खर्चकपातीसाठी आता सरकारची धडपड सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 05:00 IST

खर्चात १२ हजार कोटींनी वाढ : पहिल्या प्रकल्पाला निधीची प्रतीक्षा

नागपूर : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा अहवाल २०१७-१८ मध्ये राष्ट्रीय जल विकास अभिकरणाच्या यंत्रणेमार्फत राज्य सरकारने तयार केला. ५३,७५१ कोटी ९८ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प २०१८ मध्येच मंजुरीसाठी पाठविला गेला. मात्र, या प्रकल्पाचा खर्च अधिक वाटत असल्याने खर्चकपातीसाठी आता सरकारची धडपड सुरू आहे. एवढेच नव्हे तर, या तीन वर्षांत प्रकल्पाचा खर्च १२ हजार कोटींनी वाढला आहे.दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पावर पुढे कसलीही हालचाल झाली नाही. वर्षभरापूर्वी राज्यात आलेल्या महाआघाडी सरकारनेही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही. कोरोनाच्या संक्रमणकाळात या प्रकल्पासाठी कसलीच तरतूद झाली नाही. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ६० टक्के व राज्य सरकारने ४० टक्के वाटा देण्याचे प्रारंभी ठरले होते. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या विसंवादामुळे यावर अद्याप चर्चा झालेली नाही.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रकल्प खर्च कमी करण्यासाठी प्रकल्पाच्या प्रस्तावात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, नेमकी कोणत्या बाबतीत खर्चकपात केली जावी, हे कळविण्यात न आल्याने यंत्रणाही संभ्रमात आहे.२०१७-१८ मध्ये प्रकल्प अहवाल सादर करताना, प्रकल्पाचा खर्च ५३,७५१ कोटी ९८ लाख रुपये आकारण्यात आला. आता या प्रकल्पाचा खर्च किंमत जवळपास ६५ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने ही दिरंगाई आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष ६५ हजार कोटी आहे. यासंदर्भातील एका जनहित याचिकेत २०१८ मध्ये सरकारने निधीअभावी आम्ही प्रकल्प पूर्ण करू शकत नसल्याचे शपथपत्र न्यायालयाला दिले आहे. त्यामुळे पुन्हा ५३ हजार कोटींचा हा प्रकल्प सरकार खरोखरच सहन करणार का, हा प्रश्नच आहे. सरकारने हा प्रकल्प तातडीने स्वीकारून पूर्ण करावा, अन्यथा वेगळे विदर्भ राज्य देऊन विकासाचा मार्ग मोकळा करावा.- अ‍ॅड. अविनाश काळे, संयोजक, लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती