शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीची रक्कम जमा केल्यावरच घरी जा

By admin | Updated: November 4, 2014 01:01 IST

संपत्ती कराची जमा होणारी रक्कम कर्मचारी दररोज बँकेत जमा करीत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. कर्मचाऱ्यांची ही प्रवृत्ती थांबविण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेत संपत्ती कराची

मनपा प्रशासनाचे निर्देश : संपत्ती कर विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले नागपूर : संपत्ती कराची जमा होणारी रक्कम कर्मचारी दररोज बँकेत जमा करीत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. कर्मचाऱ्यांची ही प्रवृत्ती थांबविण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेत संपत्ती कराची वसूल करण्यात आलेली रक्कम त्याच दिवशी बँकेत जमा करावी असे निर्देश दिले आहेत. जेव्हापर्यंत कर्मचारी वसूल केलेली रक्कम बँकेत जमा करणार नाही, तोपर्यंत त्यांना घरी जाता येणार नाही. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास निलंबनाची कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे या निर्देशानंतर संपत्ती कर विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या काही झोन कार्यालयात संपत्ती कराची रक्कम वसूल करण्यात आली. परंतु ती रक्कम महिना उलटूनही बँकेत जमा करण्यात आली नाही. संबंधित प्रकरणात अनेक कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू आहे. यामुळे महापलिकेला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सध्या संपत्ती कर भरण्याची प्रक्रिया कॉम्प्युटराईज आणि मॅन्युअली अशी दोन्ही पद्धतीने सुरू आहे. संपत्तीधारकांच्या सुविधेसाठी टॅबलेट आणि प्रिंटर संपत्ती कर विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. संपत्ती धारकांच्या घरी पोहोचून कर्मचारी थेट कर स्वीकारून त्याची पावती देतात. मॅन्युअली सुद्धा पावती देऊन रक्कम वसूल केली जात आहे. दोन्ही व्यवस्थेमुळे वसूल करण्यात आलेली रक्कम सहायक आयुक्तांमार्फत तातडीने बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एखादा कर्मचारी रक्कम त्याच दिवशी जमा करणार नाही, तर त्याला घरी न जाऊ देण्याचे निर्देश आहेत. उपायुक्त संजय काकडे यांनी यासंबंधात सांगितले की, संपत्ती कर व्यवस्था आणखी सहज व प्रभावी बनविण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गत ही व्यवस्थासुद्धा केली जात आहे. कराच्या रूपात दररोज जमा होणाऱ्या रकमेची माहिती देणे व ती बँकेत जमा करणे बंधनकारक आहे.(प्रतिनिधी)