लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एप्रिल महिन्यात लोकांची लाहीलाही करणारा सूर्य मे महिन्यातही चांगलाच तळपणार असे चित्र आहे. दक्षिणेकडून सूर्याने उत्तरायणाचा प्रवास सुरू केला असून, अक्षवृत्तीय स्थितीनुसार ३ ते ३१ मे या कालावधीत सूर्य विशेषतः महाराष्ट्राच्या डोक्यावरून जाणार आहे, ज्यामुळे उन्हाचे चटके आणखी तीव्र होण्याची शक्यता अधिक आहे. मे महिन्यात विदर्भातील जिल्ह्यात कमाल तापमान ४६ अंशांच्या पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्याची भौगोलिक स्थिती १५ ते २२ उत्तर अक्षांश असून, सूर्यकिरणे सरळ पडण्याचा कालावधी सुमारे २८ दिवसांचा राहील. त्याची सुरुवात दक्षिणेकडून उत्तरेकडे असेल. या कालावधीत पूर्व-पश्चिम सुमारे एका अंशाच्या १०० किलोमीटर अंतराच्या पट्टयातील ठिकाणी सूर्य किरणे लंब रूपात पडतील, त्या-त्या भागात माध्यान्हाचे वेळी सूर्य नेमका डोक्यावर येईल. या ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येईल.
राज्यात शून्य सावली कधी, कुठे?
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी, तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशांवरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. दुपारी १२:०० ते १२:३५ या वेळात सूर्य निरीक्षण करता येईल.
३ मे - सावंतवाडी, शिरोडा मांगेली, खुशगेवाडी, आंबोली.१८ मे - पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व मुंबई, कोकणचा भाग.१८ मे - विदर्भाच्या प्रदेशात शून्य सावली अनुभवता येईल.१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा.१९ मे - औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी.२० मे - चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल.२१ मे - मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना.२२ मे-मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी.२३ मे - खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड.२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर.२५ मे - जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा.२६ मे - नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा.२७ मे - नंदुरबार, शिरपूर, बुन्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक.
Web Summary : Maharashtra will experience intense heat as the sun moves overhead from May 3rd to 31st. Various regions will observe 'zero shadow days' at midday, with specific dates for different districts. Vidarbha may see temperatures exceeding 46 degrees Celsius.
Web Summary : महाराष्ट्र में 3 मई से 31 मई तक सूर्य के सीधे ऊपर आने से भीषण गर्मी पड़ेगी। विभिन्न क्षेत्रों में दोपहर में 'शून्य छाया दिवस' मनाया जाएगा, जिसके लिए अलग-अलग जिलों की विशिष्ट तिथियां हैं। विदर्भ में तापमान 46 डिग्री सेल्सियस से अधिक हो सकता है।