शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर उपाय शोधा

By admin | Updated: January 8, 2015 01:22 IST

भंडारा रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्याची मौखिक सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना केली.

तिढा भंडारा रोडचा : पोलीस आयुक्तांना हायकोर्टाच्या सूचनानागपूर : भंडारा रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्याची मौखिक सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना केली.भंडारा रोडवरील अव्यवस्थेसंदर्भात अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती कागदावरच आहे. अतिक्रमणाची समस्या कायमची निकाली काढण्यात अद्यापही यश आलेले नाही. रोडवर नियमित बाजार भरतो. फेरीवाले उभे राहतात. दोन्ही बाजूच्या फुटपाथवर मेकॅनिक्सचा ताबा आहे, असे न्यायालयाला सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने समस्याग्रस्त भागात अकस्मात जाणे, नियमित पेट्रोलिंग करणे असे उपाय करता येतील असे सुचविले. तसेच, पोलीस विभाग व महानगरपालिकेला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, तर मध्यस्थातर्फे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)