शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 01:13 IST

नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

ठळक मुद्देप्रतिष्ठाने सुरू करण्याची मागणी : अनावश्यक खर्चामुळे संचालक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.उत्पन्न नसल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, वीज आणि अन्य देखभाल खर्च करताना महत प्रयत्न करावे लागत आहे. भविष्यात हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही दैनंदिन खर्च, सुरक्षा व सॅनिटायझेशनचा अतिरिक्त खर्च, कच्च्या मालाची उपलब्धता, कामगारांचा तुटवडा आदींसह अनेक आव्हानामुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार का, अशी चिंता व्यावसायिकांना सतावत आहे. हॉटेलचालक, व्यवस्थापक, वेटर, आचारी, स्वच्छता कर्मचारी, भाजीपाला पुरवठादार असे अनेक घटक या क्षेत्रावर अवलंबून आहेत.मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद करण्यात आले. बँकांच्या कर्जाचे हप्ते, जागेचे भाडे, कामगारांचा पगार, वीज बिल आदींच्या खर्चामुळे हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. नियम आणि अटींच्या आधारे हॉटेल व रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

व्यावसायिकांसमोर वर्षभर आर्थिक अडचणी राहणारग्राहकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. शासनाच्या शाश्वतीनंतरच हॉटेल व्यवसाय सुरळीत होणार आहे. ग्राहकांमध्ये स्वच्छतेचा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. त्याकरिता हॉटेल्स व रेस्टॉरंटचे वारंवार सॅनिटायझेशन, कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी, वेटरला मास्क व हॅन्डग्लोव्हज उपलब्ध करून द्यावे लागतील. कामगार स्वगृही परतल्याने तुटवडा भासणार आहे. दैनंदिन खर्चही अडचणीचा ठरणार आहे. पुढचे एक वर्ष व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरणार आहे.हॉटेल्स व लॉज सुरू करण्याची मागणीअन्य जिल्ह्यातून येणारे प्रवासी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉटेल्स आणि लॉज सुरू करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे करणार आहे. याबाबत एक निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना देणार आहे. संपूर्ण जून महिना हॉटेल्स व लॉज बंद राहणार आहेत. ते लवकरच सुरू होऊन आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत.तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर