शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडिलाने आईकडून स्वत:कडे मुलाचा ताबा घेणे अपहरण नव्हे, हायकोर्टाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: November 2, 2023 18:15 IST

वडील असतात पहिले नैसर्गिक पालक

नागपूर : सक्षम न्यायालयाचा कोणताही मनाईहुकुम लागू नसताना हिंदू वडिलांनी आईच्या ताब्यातील अल्पवयीन मुलाचा ताबा बळजबरीने स्वत:कडे घेतल्यास अपहरणाचा गुन्हा होत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी एका प्रकरणात दिला.

या प्रकरणातील मुलगा तीन वर्षांचा असून त्याचे वडील बुलडाणा तर, आई अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. आई-वडील कौटुंबिक मदभेदामुळे विभक्त झाले आहेत. तेव्हापासून तो मुलगा आईच्या ताब्यात होता. परंतु, २९ मार्च २०२३ रोजी वडीलाने त्या मुलाचा ताबा बळजबरीने स्वत:कडे घेतला. त्यामुळे आईने अमरावती येथील गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता वडिलाविरुद्ध अपहरणाचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. परिणामी, वडिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरील अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता वडिलाची संबंधित कृती अपहरणाचा गुन्हा होऊच शकत नाही, असे स्पष्ट करून वादग्रस्त एफआयआर रद्द केला. वडीलातर्फे ॲड. पवन डहाट व ॲड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.

काय म्हणाले न्यायालय?

हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायद्यानुसार मुलाचे पहिले नैसर्गिक पालक वडील असतात. त्यानंतर आईचा क्रमांक लागतो. भारतीय दंड विधानानुसार, अपहरणाचा गुन्हा होण्यासाठी मुलाला कायदेशीर पालकांच्या ताब्यातून सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. या प्रकरणात मुलाला सोबत घेऊन जाणारे वडील कायदेशीर पालक आहेत. तसेच, मुलगा आईच्याच ताब्यात राहील, असा सक्षम न्यायालयाचा आदेश नाही. त्यामुळे वडिलाविरुद्ध अपहरणाचा एफआयआर दाखल केला जाऊ शकत नाही, असे न्यायालय म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोटHigh Courtउच्च न्यायालय