शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या शस्त्रक्रिया आता गरीबांच्या कक्षेत  : संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:15 IST

हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण व ‘हिप जाईंट’ प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रिया गरिबांच्या कक्षेत आल्या आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

ठळक मुद्दे ‘आयसीआरए-पेन २०१९’ आंतरराष्ट्रीय परिषद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना फायद्याची ठरत आहे. विशेषत: या दोन्ही योजनांमुळे एकेकाळी हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण व ‘हिप जाईंट’ प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रिया गरिबांच्या कक्षेत आल्या आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले. ‘इंडियन सोसायटी ऑफ स्टडी ऑफ पेन’ नागपूर ‘ददराडिया पेन इन्स्टिट्यूट’ कोलकाता यांच्या सहकार्याने ‘आयसीआरए-पेन २०१९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे शनिवारी एका खासगी हॉटेलमध्ये उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. सी.एस. चाम, आयोजन सचिव डॉ. सुनीता लवंगे, डॉ. गौतम दास, डॉ. बी.एम. राजुरकर, डॉ. अंजली कोल्हे आदी उपस्थित होते. डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी आरोग्यावरील शासनांच्या योजनांची माहिती देऊन जास्तीत लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. यावेळी उपस्थितांचे स्वागत डॉ. चाम यांनी केले. परिषदेमागील भूमिका परिषदेचे संरक्षक डॉ. दास यांनी मांडली. कार्यक्रमाला डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. एस.पी. मांजरेकर, डॉ. शेलगावकर, डॉ. उमेश रमतानी डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अर्चना मुनिश्वर, डॉ. देवयानी ठाकूर, डॉ. हेमा शिर्के, डॉ. किरण व्यवहारे, डॉ. निलोफर शकीर, डॉ प्रिया सदावर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन डॉ. देवयानी ठाकूर व डॉ. उमेश रमतानी यांनी केले. डॉ. सुनीता लवंगे यांनी आभार मानले. यावेळी विविध वैज्ञानिक सत्रामध्ये दीर्घकालीन वेदनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवस्थापन कसे करावे, यावर प्रकाश टाकण्यात आला. त्याच प्रकारे रेडियो फ्रिक्वेंसीच्या माध्यमातून उपचार करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. ‘क्लिनिकल इव्हॅल्युएशन ऑफ पेशंट ऑफ पेन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चालणाºया या परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञासह २५० फिजिशियन तसेच अ‍ॅनेस्थेशिया तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य