शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकांना प्रतीक्षा ‘अच्छे दिन’ येण्याची

By admin | Updated: July 3, 2014 00:56 IST

मागील ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी केंद्र सरकारने लागू करून माजी सैनिकांच्या जीवनातही चांगल्या दिवसाची (अच्छे दिन) सुरुवात करावी, अशी मागणी आता जोर

नागपूर : मागील ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी केंद्र सरकारने लागू करून माजी सैनिकांच्या जीवनातही चांगल्या दिवसाची (अच्छे दिन) सुरुवात करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नागपुरात अलीकडेच महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेच्या नेतृत्वात एक बैठक झाली. या बैठकीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘वन रँक वन पेन्शन’लागू करण्यास विलंब करू नये, अशी विनती केंद्र सरकारकडे केली आहे.वन रँक वन पेन्शनलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकलात अंशत: तरतूदही केली होती. निवडणुकीच्या प्रचार काळातही नरेंद्र मोदी यांनीही माजी सैनिकांची ही मागणी सत्तेत आल्यावर पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. मोदी सरकार सत्तारूढ झाले आहे. दोन आठवड्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी सैनिकांच्या संघटनांनी केंद्राकडे त्यांच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. १९८२ मध्ये सर्वप्रथम माजी सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून केंद्रात आलेल्या प्रत्येक सरकारकडे सैनिकांच्या संघटनांकडून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी प्रशासकीय यंत्रणा या प्रस्तावाची चुकीची मांडणी सरकारकडे करीत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे येत गेले. सध्या सैन्यदलातून निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत इतरांची (बिलो आॅफिसर्स रँक) पेन्शन अत्यल्प आहे. ही असमनाता दूर करण्यासाठी ‘वन रँक वन पेन्शन’ची अत्यंत आवश्यकता आहे. अर्थसंकल्पात तरतूद कराया योजनेचा अंतिम मसुदा तयार करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यावी आणि यासंदर्भात निर्णय घेताना सैनिकी अधिकाऱ्यांशी सरकारने सल्लामसलत करावी. सैनिकांची आठवण दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिनी करण्यात येते. मात्र सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेला सैनिक कोणत्या हालअपेष्टांना तोंड देतो याकडे सरकारचे वर्षभर दुर्लक्ष होते. यंदा सत्ताबदलानंतर सर्वांना ‘अच्छे दिन’ येणार याची प्रतीक्षा आहे. माजी सैनिकांचाही त्यात समावेश आहे. ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करून सरकारने हे पाऊल उचलावे. यासाठी नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रयत्न करावे. मनोहर भातकुलकरमहाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना