शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
6
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
7
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
8
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
9
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
10
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
11
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
12
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
13
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
14
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
15
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
16
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
17
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
18
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
19
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
20
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिगणनेनंतरही ‘तो’ वाघ ‘मिसिंग’च

By admin | Updated: May 19, 2014 00:55 IST

बोरधरण परिसरातील राममंदिरजवळ दिसणार्‍या वयस्क पट्टेदार वाघाची हत्या झाल्याच्या संशय आता गडद झाला आहे़ ‘त्या’ वाघाची माहिती देणार्‍या अधिकार्‍यात एकसूत्रतेचा अभाव असून जबाबदार अधिकारी

 प्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)

बोरधरण परिसरातील राममंदिरजवळ दिसणार्‍या वयस्क पट्टेदार वाघाची हत्या झाल्याच्या संशय आता गडद झाला आहे़ ‘त्या’ वाघाची माहिती देणार्‍या अधिकार्‍यात एकसूत्रतेचा अभाव असून जबाबदार अधिकारी कानावर हात ठेवत असल्याने हा वाघ गेला कुठे, याचा तपास आता वरिष्ठ पातळीवरून करण्याची गरज निर्माण झाली आहे. बुधवारी बोर अभयारण्यात ४९ पाणवठ्यांवर ४९ मचाणी उभारल्या गेल्या. सर्व ठिकाणी शासकीय कर्मचार्‍यांसह एक एनजीओ सदस्य सोबतीला होता. हलकी पावसाची सर आली; पण प्रगणनेसाठी मचाणीवर चढलेले कर्मचारी खाली उतरले नसल्याचे सांगण्यात आले़ दररोज दिसणारा वाघ प्राणी गणनेमध्ये दिसेल, असे वाटत होते; पण एकही वाघ मचाणीवर चढलेल्यांना दिसला नाही, अशी विश्वसनिय माहिती आहे. या प्रगणनेत कुणी चार तर कुणी पाच वाघ, दोन बिबट दिसल्याचे सांगतात; पण वास्तव वेगळेच आहे. अद्याप त्या वाघाचा ठावठिकाणा अधिकार्‍यांना लागला नाही. बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करूनही ते उत्तर देण्याचे सौजन्य दाखवित नाही़ जुन्या बोर अभयारण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे; पण त्यांना जंगलातील एकूण वाघांची संख्येची प्राथमिक माहितीही नाही. बेपत्ता वाघाचे प्रकरण शेकू नये म्हणून न आढळलेल्या वाघांच्या संख्येचे आकडे घालून माहिती पुरविण्याची तयारीही बोर अभयारण्य प्रशासनाने चालविली आहे़