शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 23:50 IST

शहरात दररोज कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देझोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात दररोज कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.आयुक्तांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची चाचणी करा, संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला लक्षणे नसल्यास होम आयसोलेशनमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करावे. याशिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे बंधनकारक आहे. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींची दहा दिवस देखरेख आवश्यक आहे.लक्षणे आढळल्यास संबंधितांनी शहरातील मनपाच्या २१ कोविड टेस्टिंग सेंटरपैकी संबंधित झोनमधील केंद्रात जाऊन चाचणी करावी. सदर रुग्ण उपचारासाठी जर एखाद्या खासगी रुग्णालयात गेल्यास कायद्यान्वये त्या रुग्णालयाने त्याची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. अशा रुग्णांची माहिती मिळताच संबंधित झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह रुग्णाच्या चाचणीबाबत आवश्यक कारवाई करावी.तर खासगी रुग्णालयांवर कारवाई७ जुलै, २०२० च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. असे आढळल्यास साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित खासगी रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. त्यादृष्टीने सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या झोनमधील खासगी रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करून त्याचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना रोज सादर करावा, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या