विदर्भात ४७ कोटींची वीजचोरी उघडकीस; महावितरणच्या भरारी पथकाची २९३४ ठिकाणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:13 IST2026-04-20T16:12:44+5:302026-04-20T16:13:45+5:30
Nagpur : महावितरण वीज हानी कमी करून ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने विदर्भात ४७ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली.

Electricity theft of Rs 47 crores exposed in Vidarbha; Mahavitaran's flying squad takes action at 2934 places
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरण वीज हानी कमी करून ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने विदर्भात ४७ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली.
उल्लेखनीय म्हणजे, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात मंडळ स्तरावर १२ आणि विभागीय स्तरावर ३ असे एकूण १५ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची परिमंडळ कार्यालयेही स्थापन करण्यात आली आहेत.
या मोहिमेत गेल्या वर्षात विदर्भातील एकूण १०,७०९ संशयास्पद वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २,९३४ ग्राहकांकडे वीजचोरी आढळली. यात ३४ कोटी रुपयांची वीजचोरी आणि १३ कोटी ४० लाख रुपयांच्या अनियमितता असे एकूण ४७ कोटी ४६ लाख रुपयांचे नुकसान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. यापैकी ४३ कोटी १४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ४०२ ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्हानिहाय प्रकरणे
जिल्हा तपासणी चोरी रक्कम लाख वसुली लाख रुपये गुन्हे दाखल
अकोला ११८४ ५७२.५७ ५५५.७० २
अमरावती १३०१ ८११.२५ ७७०.०३ ३
बुलढाणा ७३३ २८६.९६ २३५.८९ ४
भंडारा ८२२ २३२.७८ २३२.०६ ११
चंद्रपूर ७८४ २१७.१५ ३८७.९७ ४
नागपूर २३५९ १३८२.३६ १००१.३७ १७२
वर्धा ७७४ २२५.२० २०३.०६ १३
यवतमाळ ४६० ११३.९२ १०५,०० ११
गोंदिया ७२१ १४५.४२ ८६.०५ ७
गडचिरोली ८०४ १६९.९१ १५७.७२ ७
वाशिम ७६७ ५८८.७१ ५७९.६१ १४
एकूण १०,७०९ ४७४६.२३ ४३१४.४६ ४०२