युवकांमुळेच राष्ट्र महाशक्ती बनेल

By Admin | Updated: July 4, 2014 01:18 IST2014-07-04T01:18:51+5:302014-07-04T01:18:51+5:30

भारतात अमेरिका, चीन, जपान या समृद्ध, शक्तिशाली राष्ट्राच्या तुलनेत सर्वाधिक युवा आहेत आणि युवकांच्या भरोशावरच आपले राष्ट्र जगात महाशक्तीचा दर्जा प्राप्त करू शकते. त्यासाठी युवकांना गुणवान

Due to youth, the nation will become a great power | युवकांमुळेच राष्ट्र महाशक्ती बनेल

युवकांमुळेच राष्ट्र महाशक्ती बनेल

वेदप्रकाश मिश्रा : जयहिंद फाऊंडेशन संस्थेद्वारे गुणवंतांचा सत्कार
नागपूर : भारतात अमेरिका, चीन, जपान या समृद्ध, शक्तिशाली राष्ट्राच्या तुलनेत सर्वाधिक युवा आहेत आणि युवकांच्या भरोशावरच आपले राष्ट्र जगात महाशक्तीचा दर्जा प्राप्त करू शकते. त्यासाठी युवकांना गुणवान बनविण्याचा संकल्प करणे गरजेचे असल्याचे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
जयहिंद फाऊंडेशन या संस्थेद्वारे मध्य नागपुरातील १० व १२ व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. यावेळी जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा, माजी मंत्री अनिस अहमद, जे. डी. कॉलेजचे सचिव अजय गोयल, युवा नेते सुमुख मिश्रा, अविनाश दोरसटवार, जुल्फेकार भुट्टो, महेश कुकडेजा, सुनील चोपडा, ललितभाई आदी उपस्थित होते. यावेळी यश कोटेचा याच्यासह १४० विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रज्ञा बडवाईक व भारती अग्रवाल यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर गोपाल पट्टम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Due to youth, the nation will become a great power