शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू

By admin | Updated: September 5, 2016 02:44 IST

खेळता-खेळता विहिरीत पडून एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नंदनवन परिसरातील मयुरपेठ येथे शनिवारी दुपारी घडली.

नंदनवन मयूरपेठ येथील घटना नागपूर : खेळता-खेळता विहिरीत पडून एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नंदनवन परिसरातील मयुरपेठ येथे शनिवारी दुपारी घडली. भावेश राम धुर्वे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. भावेशची आई मोलकरणीचे काम करते. वडील आजारी असल्याने घरीच असतात. शनिवारी सकाळी भावेशची आई कामाला निघून गेली. घरी भावेश व त्याचे वडील होते. दुपारी ४ वाजता भावेश घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला. घरासमोरच मोकळ्या प्लॉटवर जुनी विहीर आहे. त्या विहिरीचा वापर होत नाही. परिसरातील नागरिक त्यात कचरा टाकतात. जवळच एका घराचे काम सुरू आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू विहिरीजवळ ठेवण्यात आली आहे. असे सांगितले जाते की, भावेश रेतीच्या ढिगाऱ्यावर बसून खेळत होता. वाळूच्या ढिगाऱ्यावर तो घसरपट्टीसारखा खेळत होता. या दरम्यान तो विहिरीत पडला असावा. भावेश विहिरीत पडला तरी कुणालाच माहिती पडले नाही. काही वेळानंतर भावेशची आई घरी आली. मुलगा कुठेच दिसत नसल्याने ती त्याला शोधू लागली. परंतु तो कुठेच सापडला नाही. अचानक तिची नजर वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली. काही दिवसांपासून भावेश तिथेच खेळत होता. तो घसरून पडल्याच्या खुणा दिसून आल्याने तो विहिरीत पडल्याचा संशय आला. विहिरीत कचरा असल्याने काहीच दिसत नव्हते. काही जणांनी विहिरीत गळ टाकून पाहिल्यावर भावेशचा मृतदेह आढळून आला. भावेशच्या मृत्यूची माहिती होताच परिसरात शोक पसरला. पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह मेडिकलला नेला. भावेश हा आई-वडिलांना एकटाच होता. वडील गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. विहीर जमिनीवर सपाट आहे. त्याला सुरक्षा भिंत नाही. त्यामुळेच वाळूवर खेळताना तो घसरून विहिरीत पडल्याचा संशय आहे. विहिरीचे मालक आणि वाळू ठेवणाऱ्याचा निष्काळजीपणासुद्धा यातून दिसून येतो. पीएसआय प्रीती कुळमेथे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)