शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना बेघर करून प्रकल्प राबवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरात नागरिकांनी २० ते २५ वर्षापूर्वी सातबारा संबंधित जमीनमालकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरात नागरिकांनी २० ते २५ वर्षापूर्वी सातबारा संबंधित जमीनमालकांच्या नावाने असल्याने या परिसरात भूखंड खरेदी करून घरे बांधली. यात आपल्या आयुष्याची कमाई खर्च केली. निवासी भाग वगळून भारतीय क्रीडा प्राधिकरणला (साई) जागा हस्तांतरित करा. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण लोकांना बेघर करू नका, अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी शुक्रवारी ऑनलाइन मनपा सभागृहात घेतली.

नगरसेवक संजय महाकाळकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. कृषी विभागाने १९६९ मध्ये मौजा वाठोडा, तरोडी (खुर्द) परिसरातील जमीन महापालिकेला हस्तांतरित केली. मात्र मागील ४५ ते ५० वर्षांत महापालिका प्रशासनाने फेरफार करून सातबारावर आपले नाव चढवले नव्हते. मूळ मालकाच्या नावाने जमीन असल्याने त्यांनी ती भूखंडधारकांना विकली. यात भूखंडधारकांचा कोणताही दोष नाही. त्यांना आता बेघर करता येणार नाही. तसेच शासनाच्या जागेवर वसलेल्यांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने वेळोवेळी घेतला आहे. एप्रिल २०११ मध्ये माजी आमदार चंद्रशेखर बावनकुुळे, सुधीर पारवे, विजय घोडमारे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून ही जमीन आरक्षण मुक्त करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे माजी अध्यक्षांनी जमीन अधिग्रहण संदर्भात भूखंडधारकांचे आक्षेप व तक्रारी मागविण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती महाळाकर यांनी दिली. जमीन मनपाच्या नावावर न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेविका आभा पांडे यांनीही मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरातील नागरिकांना बेघर न करता प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी केली. नागरिकांनी महसूल विभागाचे रेकॉर्ड बघून भूखंड खरेदी केले. आता या जागेवर मनपा आपला दावा करीत आहे. आजवर ही जागा मनपाने आपल्या नावावर का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

.....

भूखंडधारकांनी समितीकडे तक्रार करावी

साईला हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीवर जे लोक वास्तव्य करीत आहेत, त्यांनी महिनाभरात त्यांची मालकी सिद्ध होते. असे शासकीय दस्तावेजासह मनपाद्वारे निर्धारित समितीकडे तक्रार करावी. यासाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि स्थावर विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच तक्रारीचे निराकरण करून पाच एकर जागेमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.