शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सुधार प्रन्यासची बरखास्ती रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

भाजपच्या काळात बरखास्तीचा निर्णय, पण प्रक्रिया अपूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तत्कालीन भाजप सरकारने नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम ...

भाजपच्या काळात बरखास्तीचा निर्णय, पण प्रक्रिया अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तत्कालीन भाजप सरकारने नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रक्रिया मात्र पूर्ण केली नाही. यातच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हापासूनच नासुप्र बरखाास्तीचा निर्णय रद्द होणार असे सांगितले जात होते. अखेर ते खरे ठरले. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नासुप्र बरखास्तीचा निर्णय रद्द करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली.

नागपूर सुधार प्रन्यास ही स्वायत्त संस्था बरखास्त करण्यासंदर्भात २७ डिसेंबर २०१६ आणि १३ ऑगस्ट २०१९ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतले होते. सध्याच्या परिस्थितीत याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता नसल्याने हे निर्णय मागे घेण्यास येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

शहरात एकच विकास प्राधिकरण असावे, या हेतूने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नागपूर सुधार प्रन्यास रद्द करून शहरातील नासुप्रच्या मालमत्ता व योजना मनपाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मागच्या भाजप सरकारने व त्यावेळी नागपूरचे मुख्यमंत्री असल्याने विधानसभेत नासुप्र बरखास्तीची घोषणा केली होती. मात्र भाजप सरकारच्या काळात नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यानंतर राज्यातील सत्ता परिवर्तनासोबतच नासुप्रला पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्य सरकारने आ. विकास ठाकरे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी नियुक्ती करून नासुप्र पुनरुज्जीवित होणार असल्याचे संकेत दिले होते.

तसेच युती सरकारच्या निर्णयानंतर नासुप्रकडील गुंठेवारी व उद्यान हे दोन विभाग मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले. नासुप्रच्या मालकीच्या शहरातील मालमत्ता व लीजवरील भूखंड अजूनही त्यांच्याकडे कायम होते. बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अजूनही नासुप्रचा कारभार सुरू होताच.

बॉक्स

शासनाचे आभार, विकास कामांना गती मिळणार

नासुप्र बरखास्तीचा निर्णय घेतल्यापासून नागपुरातील १९०० व ५७२ ले आऊटमधील विकास कामे रखडली होती. लोकांना आरएल लेटर मिळत नव्हते. कुठलेही काम होत नव्हते. लोकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन नासुप्र बरखास्तीचा निर्णय रद्द करावा म्हणून मी मागणी लावून धरली. विधानसभेतही हा प्रश्न लावून धरला. सातत्याने पाठपुरावा केला. माझ्या प्रयत्नांना अखेर यश आले.शासनाने नासुप्र बरखास्ती रद्द केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासनाचे आभार. आता रखडलेली विकास कामे मार्गी लागतील.

आ. विकास ठाकरे, विश्वस्त, नासुप्र