शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी ही आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित

By admin | Updated: June 19, 2016 02:53 IST

जगभरातील शोषित, वंचितांची ऊर्जाभूमी व प्रेरणाभूमी म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे.

डॉ. आंबेडकर अध्यासन : परिसंवादात वक्त्यांचा सूरनागपूर : जगभरातील शोषित, वंचितांची ऊर्जाभूमी व प्रेरणाभूमी म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे. आज दीक्षाभूमी उभी आहे ती केवळ अ‍ॅड. हरीदासबाबू आवळे यांच्यामुळेच. दीक्षाभूमी ही खऱ्या अर्थाने आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित आहे, असा सूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे आयोजित विशेष परिसंवादातील वक्त्यांनी काढला. कर्मवीर अ‍ॅड. हरीदास बाबू आवळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे रामदासपेठ येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात शनिवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत कर्मवीर अ‍ॅड. हरिदास बाबू आवळे यांचे योगदान’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते, तर भालचंद्र लोखंडे, कर्मवीर आवळे बाबू विचार प्रबोधन मंचचे अध्यक्ष विनायक जामगडे आणि डॉ. चंद्रशेखर पाटील हे वक्ते होते. पूरणचंद्र मेश्राम म्हणाले,दीक्षाभूमीसाठी आवळेबाबू यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज दीक्षाभूमी उभी राहू शकली. आंबेडकरी चळवळीतील नायकांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा नायकांवर संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विजय जामगडे म्हणाले, ज्यावेळी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा आवळेबाबू मध्यप्रांतातील अतिशय दुर्गम भागात चळवळीचे काम करीत होते. त्यांच्यापर्यंत उशिरा माहिती मिळाली. कुठलेही साधन नसल्याने त्यांना परिनिर्वाणाला उपस्थित राहता आले नाही, परंतु त्याचा बाऊ करण्यात आला. मात्र ते डगमगले नाही. शेवटपर्यंत चळवळीचेच कार्य करीत राहिले. डॉ. पाटील व भालचंद्र लोखंडे यांनीही आवळे बाबू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. योगानंद बलरामजी टेंभुर्णे यांनी आवळेबाबू यांच्यावर कविता सादर केली. डॉ. रमेश शंभरकर यांनी प्रास्ताविक व संचालन केले. प्रा. शैलेंद्र धोंगडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चळवळीतील शिलेदारांच्या कार्यातून तरुणांना मिळेल ऊर्जा आंबेडकरी चळवळ सध्या संक्रमणावस्थेत आहे. तिला ऊर्जा प्राप्त करून देण्याची गरज आहे. यासाठी साहित्य, सभा व विविध माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळीतील शिलेदारांच्या कार्याची माहिती पोहोचवण्याची गरज आहे. या शिलेदारांच्या कार्यातून तरुण पिढीला ऊर्जा मिळेल, आणि त्यातून चळवळ पुन्हा नव्या जोमाने गतिमान होईल, अशी अपेक्षा डॉ. प्रदीप आगलावे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.