जीवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’; निष्काळजीपणा कळस, नागपूरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 14:10 IST2021-04-10T14:10:18+5:302021-04-10T14:10:31+5:30
प्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले आहेत.

जीवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’; निष्काळजीपणा कळस, नागपूरमधील घटना
नागपूर: रुग्ण महिला जीवंत असताना नातेवाईकांच्या हाती ‘डेथ सर्टिफिकेट’ देऊन दुसºयाचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील ‘गायकवाड पाटील कोविडालय’ या कोविड केअर सेंटरमध्ये घडला. या प्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले आहेत.
रुग्णाचे नातेवाईक मनोज लिहीतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, माझी मावशी काशीनगर येथील रहिवासी, ६३ वर्षीय आशा मून या शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्या. कुटुंबात हा आजार पसरू नये म्हणून त्यांना डोंगरगाव येथील पूर्वीचे गायकवाड पाटील कॉलेज तर आताचे कोविडालयात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भरती केले. भरती केल्यानंतर तेथील कर्मचाºयांनी नातेवाईकांना घरी पाठविले. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नात्कोविडालयातून फोन आला. आशा मून यांचा हृद्य विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली.
सर्व नातेवाईक कोविडायलयात पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा मून यांच्या नावाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा दाखविण्याची अट घातली. बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाईकांनी मून यांना जिथे ठेवले होते तिथे धाव घेतली. त्या पलंगावर बसून होत्या. नातेवाईकांनी याच जाब विचारल्यावर तेथील बाऊन्सरने सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. मावशीला तेथून डिस्चार्ज दिला. घरी होम आयसालेशनमध्ये ठवेले. या प्रकरणाची तक्रार करण्यास हिंगणा पोलीस ठाण्यात जात असल्याचेही लिहीतकर यांनी सांगितले.