दयाशंकर तिवारी यांचा राजकीय प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST2021-01-08T04:19:09+5:302021-01-08T04:19:09+5:30

सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आणि राजकारणात प्रदीर्घ अनुभव असणारे ५७ वर्षीय दयाशंकर तिवारी ५४ वे महापौर आहेत. मनपाचा तब्बल ...

Dayashankar Tiwari's political journey | दयाशंकर तिवारी यांचा राजकीय प्रवास

दयाशंकर तिवारी यांचा राजकीय प्रवास

सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आणि राजकारणात प्रदीर्घ अनुभव असणारे ५७ वर्षीय दयाशंकर तिवारी ५४ वे महापौर आहेत. मनपाचा तब्बल २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते हंसापुरी येथील रहिवासी असून त्यांनी इतिहास विषयात स्नातकोत्तर पदवी, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन, हिंदी साहित्य रत्न शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खदान शाखा येथे बालपणापासून स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात काम केले आहे.

- विद्यार्थीदशेत वादविवाद स्पर्धेमध्ये ५८२ पुरस्कार

-१९८८ ते १९९१ या काळात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष

- १९९२ ते १९९४ मध्ये ते भारतीय जनता विद्यार्थी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक

- १९९५ ते १९९७ भारतीय जनता पार्टी नागपूर शहर मंत्री

-२००७ ते २०१० भाजपाचे विदर्भ प्रदेश प्रवक्ता राहिले.

- १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक, पुढे २०१२ व २०१७ मध्ये नगरसेवक

- २००१ ते २००७ व २०१५ ते १७ मनपा सत्तापक्षनेता

-२०१३ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष व नासुप्र विश्वस्त

Web Title: Dayashankar Tiwari's political journey