शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारावर हल्ला

By admin | Updated: January 12, 2017 01:44 IST

शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला.

शांतिनगरात गँगवारची शक्यता : पोलिसांच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये दहशत नागपूर : शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला. अनवरच्या खुनाने संतापलेला त्याचा भाऊ अकबर याने साथीदाराच्या मदतीने हा हल्ला केला. अनवरनंतर आपलाही खून होण्याच्या भीतीने अकबरने हा हल्ला केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर शांतिनगर परिसरात गँगवार भडकण्याची शक्यता बळावली आहे. अनवर ऊर्फ चांदी याचा सव्वा वर्षांपूर्वी अपहरण करून खून करण्यात आला होता. चांदीच्या खुनाला सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी गुन्हासुद्धा दाखल केला नव्हता. प्रकरण अंगावर शेकल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शांतिनगर परिसरातील कुख्यात गुंड वसीम ऊर्फ चिऱ्याने अयाज व इतर साथीदारांच्या मदतीने चांदीचा खून केला होता. तसेच मृतदेह कामठीतील कालव्यात फेकला होता. या खुनाचा मुख्य सूत्रधार वसीम अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर अयाज आणि इतर आरोपी दीड महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चांदी हत्याकांडातील आरोपी अनेक दिवसांपासून अकबरला धमकावीत आहेत. अनवरनंतर त्याचाही खून करण्यात येणार असल्याचे सांगून ते लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. यामुळे अकबर संतापला होता. त्यामुळेच त्याने भावाच्या खुनाचा बदला घेऊन अयाजला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री ९.३० वाजता अय्याज शांतिनगरमध्ये बसला होता. अकबर आपल्या साथीदारांसोबत तिथे आला. येताच ‘तू माझ्या भावचा खून का केला’ असे विचारीत धमकावू लागला तसेच मारहाण केली. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अयाजने शांतिनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दंगा व मारहाणीचा गुन्हा दाखल करीत अकबर व त्याच्या साथीदारांना अटक केली. या घटनेनंतर शांतिनगर परिसरात दहशत पसरली आहे. अकबर आॅटोचालक आहे. त्याच्या साथीदारांचे म्हणणे आहे की, पोलीस अकबर व त्याच्या नातेवाईकांना त्रास देत आहे. अयाज आणि अनवर हत्याकांडातील आरोपी काही दिवसांपासून लोकांना धमकावित आहेत. चांदीच्या खुनाचा मुख्य आरोपी वसीम याला पकडण्यासाठी पोलिसांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. पोलिसांनी याबाबत उदासीन धोरण अवलंबिले आहे.(प्रतिनिधी) गुन्हेगारांना मिळत आहे आश्रय सूत्रांनुसार चांदी हत्याकांडातील आरोपींना पोलिसांचा आश्रय मिळाला आहे. जामिनावरून आल्यापासून आरोपी लोकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांनाही आहे. त्यानंतरही पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. यामुळे ताजी घटना घडली.