शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

क्रेन चालकाने घेतला मायलेकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST

लकडगंज रेल्वे क्रॉसिंग जवळ अपघात : परिसरात तणाव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नातेवाइकांना भेटून आपल्या घराकडे निघालेल्या मायलेकाच्या ...

लकडगंज रेल्वे क्रॉसिंग जवळ अपघात : परिसरात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नातेवाइकांना भेटून आपल्या घराकडे निघालेल्या मायलेकाच्या दुचाकीला क्रेन चालकाने धडक दिल्यामुळे दोघांचाही करुण अंत झाला. रविवारी रात्री हा भीषण अपघात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. कुसुम दिलीप बसेना (वय ४७) आणि ललित दिलीप बसेना (वय १८) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. लकडगंजच्या चणा ओळीत राहणारे बसेना मायलेक रविवारी सायंकाळी आपल्या नातेवाइकाच्या घरी गेले होते. तेथून रात्री ९.१५च्या सुमारास ते दुचाकीने आपल्या घराकडे निघाले. दुचाकी ललित चालवत होता. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीसीपी झोन ऑफिस, रेल्वे क्रॉसिंगजवळ क्रेनला ओव्हरटेक करून समोर येताच, ललितच्या दुचाकीला क्रेनची धडक बसली. त्यामुळे मायलेकांचा करुण अंत झाला. ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला, तेथे बांधकाम सुरू असल्याने साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडसर ठरला असून, छोटे-मोठे अपघात त्या ठिकाणी नेहमीच घडतात. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप करून जमाव संतप्त झाला. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच, लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठविले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. महेंद्र देवनाथ वर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी क्रेन (केए ३५ / बी १४६५) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सूत्रांच्या माहितीनुसार, या कुटुंबातील प्रमुख दिलीप बसेना यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे कुसुम आणि ललित यांच्यावर कुटुंबाचा भार होता. आता मायलेकाचा अपघाती मृत्यू झाल्याने, त्यांच्या शेजाऱ्यांत तीव्र शोककळा पसरली आहे.

---