शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : होय...मी केली 'कोरोना'वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:34 IST

अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला.

ठळक मुद्दे‘कोरोना’तून बाहेर पडलेल्या अभियंत्याची भावना : वैद्यकीय यंत्रणेमुळे मिळाला दिलासा

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आयुष्यात सगळे काही ‘ऑल इज वेल’च चालले होते. अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला. त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले आणि आज मी माझ्या पायांनी स्वत:च्या घरी पोहोचलो आहे. आज मी म्हणू शकतो की, ‘हो मी कोरोनावर मात केली आहे. ‘कोरोना’तून बाहेर पडलेल्या नागपुरातील ‘आयटी’ अभियंत्याने ही भावना व्यक्त केली व आपल्या लढ्याबद्दल सांगितले.अमेरिकेतून परत आल्यानंतर तीन सहकाऱ्यांना ‘कोरोना’ झाल्याचे समजले. त्यानंतर मी घरीच स्वत:ला ‘क्वारंटाईन’ केले व तपासणीसाठी गेलो. मला ‘असिम्टोटिक कोरोना’ झाल्याचे निदान झाले. मला ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आले व उपचारांना सुरुवात झाली.रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी डॉक्टरांकडून मला ‘मल्टिव्हिटॅमिन’ गोळ्या देण्यात आल्या. या कालावधीत प्रचंड तणाव आला होता. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न व रुग्णालयातील सुविधा पाहून थोडा दिलासा मिळत होता.डॉक्टरांच्या सूचनेनुसार मी स्वत:चे वेळापत्रक बनविले. त्यात वाचन, खोलीतच चालणे, सकारात्मक वाचन व ‘व्हिडीओ’ यांचा त्यात समावेश होता. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले अन् सातव्या दिवशी माझी नमुना तपासणी ‘निगेटिव्ह’ आली, असे संबंधित अभियंत्याने सांगितले.योग्य काळजी आवश्यक‘कोरोना’ला योग्य काळजी घेऊन पूर्ण हरवता येते. मी एकांतवासाचा पूर्ण सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. तसेच सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात ठेवली होती. जर नागरिकांना ‘कोरोना’पासून वाचायचे असेल तर त्यांनी घरीच सुरक्षित थांबावे, असे त्यांनी आवाहन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर