शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

"शासनाचा लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’च", नागपुरात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 13:05 IST

Coronavirus Nagpur : मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला.

नागपूर - राज्य शासनाने सोमवारी काढलेला लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाºयांसाठी ‘डेथ वारंट’च असल्याचे मत विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केले. ("Government's lockdown order is a 'death warrant' for traders", traders announce in Nagpur)मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला. यावरून व्यापारी आणि पोलिसांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. इतवारी चौकात व्यापाºयांनी एकत्रित येऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. शासनाने ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने व्यापारी संकटात आले आहेत. शासनाने वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू ठेवायला हवी होती. पुढे सण आहेत. व्यापाºयांनी माल भरला आहे. त्याच्या रकमेची परतफेड करायची आहे. व्यापार बंद राहिल्यास परतफेड कशी करणार, असा सवाल आहे. त्यामुळे व्यापारी आणखी संकटात येणार असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, शासनाने लॉकडाऊनचा आदेश काढून व्यापा-यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. शुक्रवार रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. आदेशात सोमवार ते शुक्रवार रात्रीपर्यंत कडक निर्बंध लावली आहेत. या दिवसातही दुकाने बंद राहणार आहे. शासनाचा लॉकडाऊन आदेश हा व्यापा-यांसाठी ‘डेथ वारंट’च आहे. यामुळे अनेक व्यापारी आत्महत्या करतील. लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणी केल्यानंतर चेंबर पुढे आंदोलनाची रूपरेषा ठरविणार आहे. सणांच्या काळात लादलेला लॉकडाऊन व्यापाºयांच्या जीवावर बेतणार आहे. सरकारने आदेश मागे घ्यावा.सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, शासनाचा ३० एप्रिलपर्यंतचा दुकाने बंदचा आदेश व्यापाºयांसाठी घातक ठरणार आहे. आधी कोरोना संपणार का, आधी व्यापारी, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गुढीपाडव्याचा सण १३ एप्रिलला आहे. सर्वांनी दागिन्यांचे आॅर्डर दिले आहेत. आता त्याचे काय होणार, असा गंभीर प्रश्न आहे. सरकारची मदत नाहीपूर्वी लॉकडाऊनच्या काळात सरकारने व्यापाºयांना काहीही मदत केली नाही, उलट चक्रवाढ व्याज लावून कर्ज वसूल केले. शिवाय आयकर रिटर्नमध्येही काहीही सूट दिलेली नाही. विजेचे बील, कर्मचाºयांचा पगार, बॅकांचे हप्ते भरावे लागले. पुढेही अशीच स्थिती निर्माण होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर