शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:39 IST

राज्यात सरकार स्थापित झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचे पद रिक्त आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याची नियुक्ती न करताच मागील अनेक अधिवेशन सरकारने काढले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय होईल का? याबाबत पत्रकारांनी विचारले असता सभापती राम शिंदे म्हणाले...

नागपूर : विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असून योग्य वेळी या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल, असे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. योग्य वेळ कधी येईल? या अधिवेशनात त्याबाबतचा निर्णय होईल की नाही, याबाबत मात्र त्यांनी स्पष्ट काहीही सांगितले नाही. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम हिवाळी अधिवेशनातही कायम आहे. यावेळी उपसभापती डाॅ. नीलम गोर्हे उपस्थित होत्या.   राज्यात सरकार स्थापित झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचे पद रिक्त आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याची नियुक्ती न करताच मागील अनेक अधिवेशन सरकारने काढले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय होईल का? याबाबत पत्रकारांनी विचारले असता सभापती राम शिंदे म्हणाले,' उद्या सभागृहात काय होणार, हे आज कसे सांगता येणार? विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती यासारख्या संवैधानिक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ही जागा नाही. विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. योग्य वेळी या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल.' पत्रकारांनी विरोधी पक्ष नेतेपदाबाबत राज्यातील काही जुन्या प्रथा परंपरांची जाणीव करून दिली. त्यावर जुन्या प्रथा परंपरा आताही सुरूच राहाव्यात असे आवश्यक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  विधानसभेत विरोधी पक्षनेता हा केवळ एका पक्षाचा प्रतिनिधी नसून संपूर्ण विरोधी पक्षांचे नेतृत्व करणारा संवैधानिक दर्जाचा पदाधिकारी असतो. सरकारच्या निर्णयांवर लक्ष ठेवणे, धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे, जनतेच्या हिताशी निगडित मुद्दे प्रभावीपणे पुढे मांडणे आणि विविध समित्यांमध्ये संतुलन राखणे यासाठी या पदाचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition leader appointment in winter session uncertain; decision at right time.

Web Summary : Appointment of opposition leader remains uncertain during winter session. Legislative Council Chairman Ram Shinde indicated a decision will be made at the right time. The post has been vacant since the government was established.
टॅग्स :Ram Shindeराम शिंदेVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपा