शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मदतीला धावून येणारा - आपुलकी जपणारा...

By admin | Updated: October 31, 2014 00:46 IST

युवा नगरसेवक, युवा महापौर व उद्या, शुक्रवारी शपथविधीनंतर युवा मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी नागपूर. या भूमीत फडणवीस यांना अनेकांच्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले.

कुणी सोबत क्रिकेट खेळले, तर कुणी टिफ ीन शेअर केले नागपूर : युवा नगरसेवक, युवा महापौर व उद्या, शुक्रवारी शपथविधीनंतर युवा मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी नागपूर. या भूमीत फडणवीस यांना अनेकांच्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले. पण राजकारणा पलीकडे जात त्यांनी व्यक्तिगत संबंध जपले. फडणवीस यांच्याशी कुणी लहानपणी क्रिकेट खेळले आहेत, तर कुणी रेल्वेत टिफीन शेअर केले आहेत. चांगल्या कामासाठी फडणवीस यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पाठबळ दिल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे राजकीय विरोधकांनाही फडणवीस आपलेसे वाटतात.प्रशासकीय बदल्यांचे समर्थनएक दुसऱ्यांना सोबत घेऊन चाललो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोक एकत्र येतात तर आपणही विदर्भासाठी एकत्र यावे, यासाठी फडणवीस यांचा आग्रह असायचा. विदर्भ विकासाच्या बैठकीत आम्ही एकत्र असायचो. ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या पत्नी आमच्या अनेक कार्यक्रमांना अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या आहेत. मी मंत्री असताना पशुसंवर्धन विभागाच्या पश्चिम महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या बदल्या विदर्भात केल्या होत्या. त्याला अनेकांनी विरोध केला. पण फडणवीस यांनी मात्र समर्थन केले. मला पाठबळ दिले. रेल्वेत अनेकदा सोबत प्रवास केला. आम्ही टिफीन शेअर केले. त्यांनी सुचविलेली कामे मी करून दिली. त्यांनीही आमची चार कामे केली. फडणवीस पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूडचा माणूस आहे. - अनिस अहमद, माजी मंत्री रेल्वेत टिफीन शेअर केले गंगाधरराव फडणवीस आणि भाऊसाहेब मुळक दोघेही चांगले मित्र होते. दोघेही सोबत आमदार होते. दोघांच्या रुम मॅजेस्टिक होस्टेलला आमोरासमोर होत्या. त्यामुळे वडिलांसोबत देवेंद्र व मी रेल्वेत अनेकदा सोबत आलो. एकमेकांचे टिफीन खायचो. मस्ती करायचो. तेव्हापासून आमची मैत्री आहे. कालांतराने ते महापौर झाले. नगरसेवक म्हणून काम करताना नेहमी घरी यायचे. त्यांचे वडील गेटवरूनच म्हणायचे छत्रपती कुठे आहे? देवेंद्र सोबत असायचा. मी मंत्री झालो त्यावेळी देवेंद्र स्वत:हून घरी आला व माझे अभिनंदन केले. पहिल्यांदा नागपूरचा मुख्यमंत्री झाला आहे. त्याने विदर्भासाठी भरीव काम करावे. एक जुना मित्र म्हणून देवेंद्रला खूप खूप शुभेच्छा. - राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री सोबत क्रिकेट खेळलोनुकतेच माझ्या घरी गणपतीच्या जेवणासाठी फडणवीस आले होते. ते आल्याचे पाहून मी त्यांना घरात दर्शनासाठी नेण्यासाठी पुढे सरसावलो. तेव्हा ते म्हणाले, विकास मला तुझ्या घरचे लोक ओळखतात. तू इथेच गेटवर थांबून येणाऱ्यांचे स्वागत कर. मी आत जाऊन दर्शन करतो. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असलेला तो काळ होता. अशावेळी राजकीय व्यक्तीने विरोधकाच्या घरी लावलेली हजेरीही बरेच वादळ उठवू शकते. पण देवेंद्रने त्याची कधीच पर्वा केली नाही. आम्ही सोबत क्रिकेट खेळलो आहोत. माझी पहिली निवडणूकही मी देवेंद्रच्याच विरोधात लढतो होतो. एकदा आमदारकीही लढलो. पण राजकारणापलीकडील आमची मैत्री आहे. - विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस