शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळला कोळसा

By admin | Updated: May 14, 2016 02:54 IST

नरखेड तालुक्यातील अंबाडा (सायवाडा) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना २१ फूट खोलीवर कोळशाचा थर आढळून आला.

अंबाडा शिवारातील विहीर : कोळसा खाण असल्याचे संकेतनरखेड/जलालखेडा : नरखेड तालुक्यातील अंबाडा (सायवाडा) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना २१ फूट खोलीवर कोळशाचा थर आढळून आला. त्यामुळे या प्रकाराची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. परिणामी, या परिसरात कोळशाची खाण असल्याचे संकेत मिळत असून, याला महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दादाराव शंकरराव सोनारे रा. अंबाडा, ता. नरखेड यांनी त्यांच्या अंबाडा शिवारातील शेतात (सर्व्हे क्रमांक - २९०/१) मध्ये नुकतेच विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली. सदर खोदकाम २१ फुटापर्यंत गेले असता, कोळशाचा थर आढळून आला. त्यामुळे सोनारे यांनी या प्रकाराची माहिती तलाठी राहुल राऊत यांच्यामार्फत नायब तहसीलदार दिनेश निंबाळकर यांना दिली. निंबाळकर यांनी याची माहिती लगेच उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे यांना देत गुरुवारी दुपारी विहिरीची तसेच त्यातून काढण्यात आलेल्या कोळशाच्या नमुन्याची पाहणी केली. सोनारे यांनी सांगितले की विहिरीत २१ फुटावर कोळशाचा थर आढळून आला. हा थर एक फूट रुंद व सहा फूट लांब होता. त्यानंतर मजुरांनी २४ फुटापर्यंत खोदकाम केले. नंतर ते थांबविण्यात आले. या कोळशाचे थरावर माती टाकण्यात आली, असेही सोनारे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नरखेड तालुक्यातील मालापूर शिवारात बोअरवेलचे खोदकाम करताना कोळसा आढळून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. परिणामी,अंबाडा, सायवाडा, इंदरवाडा, रोहणा, कलंभा, गोंडीदिग्रस, मालापूर तसेच आंबाडा लगतच्या वर्धा जिल्ह्यात कोळशाच्या खाणी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच आ. डॉ. आशिष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे यांनी या शेताची पाहणी करून कोळशाचे नमुने घेतले. सदर नमुने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यामार्फत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कातडे यांनी सांगितले. (तालुका/प्रतिनिधी)औद्योगिकीकरणाला भरपूर वावया विहिरीत आढळून आलेला हा कोळसा असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्यास या भागात कोळशाची खाण आहे, हे सिद्ध होईल. त्यामुळे या भागाच्या औद्योगिकीकरणाला भरपूर वाव आहे. कोळसा खाण आणि औद्योगिकीकरण यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. खाणीसाठी वेकोलिने शेती अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल. पर्यायाने या भागात मोठे प्रकल्प उभे राहतील. शेतकरी सुखी होतील.- आ. डॉ. आशिष देशमुख, काटोल मतदारसंघ