शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरण माहिती अपलोडसाठी ‘को-विन’ अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात कोविड लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. लसीकरणादरम्यान माहिती अपलोड करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात कोविड लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. लसीकरणादरम्यान माहिती अपलोड करण्यासाठी ‘को-विन’ अ‍ॅप तयार करण्यात येत असल्याची माहिती बुधवारी शहरातील शासकीय, निमशासकीय आणि मनपा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टाऊन हॉल येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात देण्यात आली.

लसीकरण कसे करायचे, यासाठी कुठली जागा असावी, संबंधित जागेवर कोणत्या सोयी असाव्यात, लोकांना लसीकरण केंद्रावर कसे आणायचे, माहिती कोविड अ‍ॅपवर अपलोड करण्यासंदर्भात तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात आले. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी कोविड-१९ साठी केलेल्या उपाययोजना आणि लसीकरण कार्यक्रमाची माहिती दिली. डॉ. वैशाली मोहकर यांनी लसीकरण नियोजनाची तर शासन दिशानिर्देश यावर एस.एम.ओ. (जागतिक आरोग्य संघटना)चे डॉ. साजीद खान यांनी व्हिडिओ, सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.

को-विन अ‍ॅप बाबत अश्विनी नागर यांनी माहिती दिली. रविल यादव यांनी कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक मॅनेजमेंट याबाबत मार्गदर्शन केले. सुरक्षित लसीकरण आणि जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत डॉ. संजय चिलकर यांनी मार्गदर्शन केले. टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनीही विविध विषयावर मार्गदर्शन केले.

सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, समन्वयक दीपाली नागरे यांनी सहकार्य केले.