नागपुरात बालक तस्करी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:09 PM2020-11-30T12:09:44+5:302020-11-30T12:11:20+5:30

Nagpur News crime news नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी महिलांद्वारे संचालित लहान मुलांची चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीतील पाच महिलांना एका पुरुषासह अटक केली.

Child trafficking gang arrested in Nagpur | नागपुरात बालक तस्करी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड 

नागपुरात बालक तस्करी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड 

Next
ठळक मुद्देसूत्रधारासह सहा जणांच्या मुसक्या बांधल्या चार वर्षाच्या चिमुकलीला केले मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी महिलांद्वारे संचालित लहान मुलांची चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीतील पाच महिलांना एका पुरुषासह अटक केली. त्यांच्या तावडीतून एका चार वर्षाच्या चिमुकलीची सुटका करण्यात आली. या टोळीने अनेक मुलांची व विक्री केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

शर्मिला विजय खाकसे (५०), रा.भंडार मोहल्ला, इंदोरा, शैला विनोद मंचलवार (३२), रा.बिरसा नगर, दिघोरी, खरबी, लक्ष्मी अमर राणे (३८), रा.सुभाष नगर, मनोरमा आनंद ढवळे (४५), रा.बारसे नगर, पांचपावली, पूजा सुरेंद्र पटले (४०), रा.साईबाबा नगर आणि तिचा पति सुरेंद्र यादवराव पटले (४४), रा. साईबाबा नगर अशी आरोपीची नावे आहे. या टोळीची सूत्रधार शर्मिला खाकसे आहे. पोलिसांना शर्मिला लहान मुलांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा तिला रंगेहात पकडण्याची पोलिसांनी योजना आखली. पोलिसांनी डमी ग्राहक बनून तिच्याशी संपर्क साधला. शर्मिलाने मुलासाठी ३.५० लाख आणि मुलीसाठी २.५० लाख रुपये मागितले. तिने नवजात बाळासोबतच तीन ते चार वर्षाचे मुलं सुद्धा हवे असल्यास उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. शर्मिलाचे म्हणणे हाोते की, जर तिला आईवडिलांचे आधार कार्ड व इतर दस्तावेज दिले तर ती थेट रुग्णालयातूनच नवजात बाळ उपलब्ध करून देऊ शकते, तिचे म्हणणे ऐकून पोलीसही चक्राहून गेले. डमी ग्राहकाने तिला तीन ते चार वर्षाची मुलगी हवी असल्याचे सांगितले. शर्मिलाने यासाठी २.५० लाख रुपये मागितले. पैशाची व्यवस्थाा होताच मुलगी उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन दिले. पोलिसांनी २.५० लाखाची व्यवस्था केली. पैसे जमल्याची सूचना तिला दिली. शर्मिलाने पैसे घेऊन मेडिकल चौकातील एका रेस्टारंटजवळ येण्यास सांगितले. पोलिसांनी शर्मिलाच्या साथीदारांना तिथे पकडण्याची योजना आखली. ठरलेल्या योजनेनुसार रात्री ८.३० वाजता डमी ग्राहक मेडिकल चौकात पोहोचला. तिथे शर्मिला, शैला मंचलवार आणि सुरेंद्र पटलेसोबत पोहोचली. तिने अगोदर पैसे दाखवण्यास सांगितले. अडीच लाख रुपये असल्याची खात्री झाल्यावर तिने काही वेळ डमी ग्राहकाला फिरवले. यानंतर चार वर्षाच्या मुलीला त्याच्याकडे सोपवले. मुलगी हाती येताच पोलिसांनी शर्मिला व तिच्या साथीदाराला पकडले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांनी रविवारी या आरोपींना न्यायालयात सादर करून सात दिवसाची पोलीस कोठडी घेतली. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अतुल इंगोले, स्मिता सोनवणे, हवालदार मंदा जांभुळकर, अनिल अंबादे, शिपाई राशिद, चेतन, मनीष, अजय, भूषण, राहुल, रुबीना, सुजाता, रिना आणि कुमुदनी यांनी केली.

स्वत:च्या मुलीचाच केला सौदा

आरोपी शैला मंचलवार हिने आपल्या १२ दिवसाच्या मुलाला काही दिवसांपूर्वीच शर्मिला खाकसेच्या मदतीने एका दाम्पत्यास विकले. मुलबाळ नसल्याने त्या दाम्पत्याने मुलाला खरेदी केले हाते. पोलीस त्या दाम्पत्याचीही विचारपूस करणार आहे. शर्मिलाचे मुलांची विक्री करणाऱ्यांसोबतच डॉक्टरांसोबतही संबंध असल्याची शंका आहे. मुलबाळ होत नसलेल्या लोकांना ती भाड्याचा गर्भ सुद्धा उपलब्ध करून देते. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक आश्चर्यचकीत खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुलीच्या आईवडिलांचा घेतला जातोय शोध

आरोपींच्या तावडीतून सोडवलेल्या चार वर्षाच्या मुलीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस तिच्या आईवडिलांचा शोध घेत आहे. ते सापडल्यावर आरोपींचे राज उघड होतील. शर्मिला अनेक दिवसांपासून मुलांच्या विक्रीचे रॅकेट चालवते. तिने काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीसाोबत याची चर्चा केली होती. त्याने पोलिसांना सतर्क केले. अटक करण्यात आलेल्या महिला संदिग्ध प्रवृत्तीच्या आहेत. त्यांचे इतर अवैध कामांमध्ये सुद्धा सहभाग असल्याची शंका आहे.

Web Title: Child trafficking gang arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.