शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला केंद्राचे समर्थन नाही

By admin | Updated: August 24, 2016 02:52 IST

संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती. परंतु आमची भूमिका ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या

केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार : देशात स्वस्ताई असल्याचाही दावानागपूर : संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती. परंतु आमची भूमिका ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या समर्थनार्थ नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी केले. भाजपाच्या विभागीय कार्यायलयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. सामान्य मनुष्याचे महागाईने कंबरडे मोडले असताना देशात डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावादेखील त्यांनी केला.देशात डाळ सोडली तर गहू, तांदूळ, तेल इत्यादी गोष्टी स्वस्त आहेत. डाळीचे उत्पादनच कमी झाले आहे. डाळीच्या पिकाला नीलगाय तसेच इतर जनावरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कि मती वाढलेल्या आहेत. परंतु उत्पादन वाढवून आणि आयात केल्याने डाळीच्या किमती नियंत्रित होऊ शकतात. डाळीच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रभावी पावले उचलत आहे, असेदेखील ते म्हणाले. गहू, तांदूळ यांचे भाव वाढलेले नाहीत. त्यामुळे या गोष्टी महाग झाल्या आहेत, असे म्हणणे योग्य होणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.जावडेकरांच्या वक्तव्यावर मौनकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यलढ्यात फासावर गेले होते, असे वादग्रस्त वक्तव्य दिले होते. यावर गंगवार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.पटेल यांची निवड योग्यचरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची झालेली निवड योग्यच आहे. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही, असे गंगवार म्हणाले. रघुराम राजन यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना हटविण्यात आलेले नाही. उर्जित पटेल देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देतील, असा विश्वास गंगवार यांनी व्यक्त केला.