शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला इमारत द्या

By admin | Updated: July 3, 2014 00:55 IST

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महिला व बाल रुग्णालयाची इमारत मिळाल्यास यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश देणे शक्य आहे.

हायकोर्टात याचिका : राज्य शासनाला मागितले उत्तरनागपूर : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महिला व बाल रुग्णालयाची इमारत मिळाल्यास यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश देणे शक्य आहे. यासाठी राहुल पुगलिया व रामदास वागदरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने चंद्रपूर येथे १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेचे महाविद्यालय व ५०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी २०१३ रोजी जीआर काढण्यात आला आहे. महाविद्यालय व रुग्णालयासाठी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. कर्मचारी नियुक्ती व अन्य सुविधांसाठी निधी मिळाला आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने महाविद्यालयाचे निरीक्षण केले आहे. परंतु महाविद्यालयाची स्वत:ची इमारत बांधण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. चंद्रपूर येथे महिला व बाल रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. ही इमारत तात्पुरती महाविद्यालयाला दिल्यास यावर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांना नोटीस बजावून एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. दीपाली सपकाळ यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)