बुद्धांच्या अस्थी दर्शनाला उलटली ३७ वर्षे

By Admin | Updated: May 14, 2014 00:42 IST2014-05-14T00:42:45+5:302014-05-14T00:42:45+5:30

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उत्खनन शाखा नागपूरने १९७३ ते ७४ मध्ये पूर्वीचे कपिलवस्तू आणि आताचे उत्तर प्रदेश जिल्हा बस्ती येथील पिपरावा परिसरात ओसाड पडलेल्या स्तूपामध्ये उत्खनन केले.

Buddha's bone has disappeared for 37 years | बुद्धांच्या अस्थी दर्शनाला उलटली ३७ वर्षे

बुद्धांच्या अस्थी दर्शनाला उलटली ३७ वर्षे

सुमेध वाघमारे - नागपूर

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उत्खनन शाखा नागपूरने १९७३ ते ७४ मध्ये पूर्वीचे कपिलवस्तू आणि आताचे उत्तर प्रदेश जिल्हा बस्ती येथील पिपरावा परिसरात ओसाड पडलेल्या स्तूपामध्ये उत्खनन केले. त्यावेळी एका कलशामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी मिळाल्या होत्या. या अस्थी १९७७ मध्ये नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आणण्यात आल्या. मात्र या अस्थींच्या दर्शनासाठी लोकांची उडालेली गर्दी पाहता रातोरात या अस्थी दिल्ली येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संग्रहालयात हलविण्यात आल्या. याची नोंद आजही मध्यवर्ती संग्रहालयात आहे.

तथागत बुद्ध यांचे परिनिर्वाण कुशीनगर येथे वैशाख पौर्णिमेला इसवीसन पूर्व ४८३ मध्ये झाले. परिनिर्वाणानंतर तथागतांचा देह सुशोभित करून सातव्या दिवशी कुशीनाराच्या पूर्वेला असलेल्या मुकुटबंधन या ठिकाणी अग्निसंस्कार केले गेले. त्यांची रक्षा आणि अस्थी गोळा करण्यात आल्या आणि त्या एका सभागारात ठेवून त्यांच्या रक्षणासाठी कुशीनाराचे सशस्त्र मल्ल कोट करून राहिले. बुद्धाच्या परिनिर्वाणाची वार्ता तोवर सर्वत्न पसरली होती.

Web Title: Buddha's bone has disappeared for 37 years