लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या शानपथकाने (आर पी एफ) दाखविलेल्या सतर्कतेमुळे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्याचा डाव उधळला गेला. नागपूर विभागाच्या आरपीएफचे पथक श्वानासह जी टी एक्सप्रेस मध्ये कर्तव्यावर तैनात होते. सेवाग्राम कडून नागपूरकडे येताना 12 मे रोजी ते कोच एस 6 मध्ये तपासणी करत असताना प्रिन्स नामक श्वानाला संशयाला त्याने सीट क्रमांक ७ खाली ठेवलेली संशयास्पद काळ्या रंगाची बॅग शोधून काढली.
संबंधित डब्यातील प्रवाशांकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रवाशाने त्या बॅगेवर मालकी हक्क सांगितला नाही. त्यामुळे त्या बॅगची तपासणी केली असता बॅगेमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. दरम्यान ही गाडी नागपूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली असता मध्याच्या बाटल्याने भरून असलेली ती बॅग उतरवून आरपीएफने ठाण्यात नेली. तेथे उपनिरीक्षक वी.पी सिंह यांच्या उपस्थितीत बॅग उघडून तपासणी करण्यात आली असता एकूण १४ विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. त्यांची अंदाजे किंमत १७, ३५० रुपये आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आरोपीचा शोध सुरू
हा मध्यसाठा कुणी कुठून आणला आणि कुठे नेत होता तसेच या मध्ये तस्करीत कोण आरोपी आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.
Web Summary : Railway Protection Force's dog squad seized foreign liquor worth ₹17,350 from a train in Nagpur. A suspicious bag was found under a seat. The liquor was handed over to the State Excise Department for further action. The search for the culprit is ongoing.
Web Summary : रेलवे सुरक्षा बल के श्वान दल ने नागपुर में एक ट्रेन से ₹17,350 मूल्य की विदेशी शराब जब्त की। एक संदिग्ध बैग सीट के नीचे मिला। शराब को आगे की कार्रवाई के लिए राज्य आबकारी विभाग को सौंप दिया गया। अपराधी की तलाश जारी है।