३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:12 IST2021-09-06T04:12:30+5:302021-09-06T04:12:30+5:30

उमरेड : स्थानिक विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ...

Blood donation by 36 blood donors | ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

उमरेड : स्थानिक विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी वीज तंत्रज्ञ स्व. अमोल धुर्वे यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उद्घाटन आमदार राजू पारवे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिमंडळचे सचिव रवी वैद्य होते. यावेळी उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ, उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत, सहायक अभियंता गिरीश मडामे, अप्रेंटिज असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत नन्नोरे, उमेश गवते, सोनू बारसागडे, मिलिंद बेगडे, बाळू इंगोले, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन गणपती सूरजागडे यांनी केले. दत्ता जाधव, वीरेंद्र मेश्राम, ईश्वर डाखरे, श्रीकांत फटिंग, नितीन बुचे, नाशिकेत चौधरी, लक्ष्मीकांत मेश्राम, प्रवीण दाढे, प्रदीप मारोडे, फारूख शेख पटेल, संजय ठुसे, आशिष बांडे, विनोद लेंढे, विष्णू जोधे, शैलेंद्र बेले, दामोदर ठाकरे, भुजंग मेश्राम, आदींनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation by 36 blood donors