शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅडबॉय’ चे कृत्य बॅडच

By admin | Updated: May 7, 2015 02:07 IST

सलमान अभिनेता आहे म्हणून काय झालं. तो शेवटी गुन्हेगार आहे.

नागपूर : सलमान अभिनेता आहे म्हणून काय झालं. तो शेवटी गुन्हेगार आहे. त्याच्यावरील गुन्हाही सिद्ध झाला आहे. कारण एका गरीब निष्पापाचा त्याने बळी घेतलाय. इतरांना आयुष्यभर अपंगत्व दिलेय. कायद्यासमोर सगळेच समान आहेत. न्यायालयाने त्याला ठोठावलेली शिक्षा म्हणजे न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट होणे आहे. भविष्यात यामुळे वचकही निर्माण होईल. वॉलीवूडच्या ‘बॅडबॉय’चे कृत्य बॅडच’ (चुकीचे) होते अशा प्रतिक्रिया नागपूरकरांनी व्यक्त केल्या. प्रत्येकालाच आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. परंतु आपल्या चुकीमुळे जर कुणी निरपराध व्यक्तीचा जीव घेत असेल तर ते दुर्दैवी आहे. दारूपिऊन निरपराध व्यक्तीचा बळी घेणाऱ्या सलमान खानला न्यायालयाने दिलेली शिक्षा अगदी योग्य आहे. ‘सेलिब्रिटी’ असो की सर्व सामान्य नागरिक, सर्वांसाठी कायदा सारखाच आहे. फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांवर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या सलमान खानला आज न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा सुनावली. सलमान खान सेलिब्रिटी असल्यामुळे त्याला शिक्षा होणार नाही, अशा वावड्या ऐकायला मिळत होत्या. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे त्या खोट्या ठरल्या. सलमान खानला शिक्षा झाल्याची वार्ता पसरताच नागपूरकर नागरिकांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर वचक निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. तसेच गुन्हा केलेल्या प्रत्येकाला शिक्षा झाल्यास देशात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण होईल. (प्रतिनिधी)सलमानला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश होते नागपुरातहीहिट अँड रन प्रकरणी आघाडीचा चित्रपट अभिनेता सलमान खान याला पाच वर्षांची शिक्षा सुनावणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे हे काही काळ नागपूर जिल्हा न्यायालयात कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार २००१-२००२ या काळात देशपांडे हे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे न्यायालय क्रमांक १ चा कार्यभार होता. या न्यायालयात इमामवाडा, सक्करदरा आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतची प्रकरणे दाखल होतात. सलमानला शिक्षा सुनावताच देशपांडे हे प्रसिद्धीच्या झोतात आले. यापूर्वीही चित्रपट अभिनेता संजय दत्त याला शिक्षा देणारे त्यावेळचे मुंबई येथील टाडा न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. कोदे हे देखील प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पुढे कोदे यांची बढती होऊन ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. काही काळ ते नागपूर खंडपीठात होते.