शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:00 IST

अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली.

ठळक मुद्देपोलीस सक्रिय : संशयित आणि सोशल मीडियावर विशेष नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली. रात्रीची गस्त वाढविण्यात आली. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील काही विशेष भागांवरही पोलिसांनी नजर रोखली आहे.संशयित व्यक्तींची नागपुरातील हजेरी आधीपासूनच चर्चेत राहिली आहे. समाजकंटकांकडून गडबड केली जाऊ शकते, अशी शंका गुप्तचर यंत्रणांकडून आधीच व्यक्त करण्यात आली आहे. संवेदनशिल स्थळांभोवती पोलिसांनी सुरक्षा कवच निर्माण केले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून नाहक वाद निर्माण करू पाहणाऱ्या उपद्रवींवरही पोलिसांनी नजर रोखली आहे. विविध जाती-धर्मातील मान्यवरांची बैठक घेऊन पोलीस आयुक्तांनी शहरातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, यासाठी आधीपासूनच प्रयत्न चालविले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि समाजकंटकांकडून कसला काही अनुचित प्रकार अवलंबला जात असेल, कुठे काही आक्षेपार्ह घडत असेल तर तातडीने पोलिसांना सूचित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.चिथावणीखोरांना इशाराशहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. मात्र, कुणी समाजकंटकांनी चिथावणीखोरांनी कोणत्याही प्रकारचा उपद्रव करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिला.

भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी     अयोध्येचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. हा निकाल कुणाच्याही बाजूने आल्यानंतर तो स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी.  अथवा निकाल आनंददायी आल्यानंतरही उन्माद करू नये, रस्त्यावर येऊन आनंद साजरा करून, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही,  याची काळजी घ्यावी. अयोध्येच्या निकालानंतर समाजात सामंजस्य रहावे, या भावनेतून विविध हिंदुत्ववादी संघटनेने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. जेणेकरून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल. तशा सूचना पोलिसांना द्याव्या, अशी भावना व्यक्त केली. यावेळी महापौर नंदा जिचकार,  आमदार प्रा. अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, प्रा. संजय भेंडे. कल्पना पांडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याNagpur Policeनागपूर पोलीस