उमरेड येथे क्रीडापटूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST2021-09-02T04:17:28+5:302021-09-02T04:17:28+5:30

उमरेड : मेजर ध्यानचंद जयंती तथा राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून उद्योन्मूख खेळाडूंचा सत्कार तसेच ‘स्पोर्टस् इंज्युरी ॲण्ड स्पोर्टस् ...

Athletes felicitated at Umred | उमरेड येथे क्रीडापटूंचा सत्कार

उमरेड येथे क्रीडापटूंचा सत्कार

उमरेड : मेजर ध्यानचंद जयंती तथा राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून उद्योन्मूख खेळाडूंचा सत्कार तसेच ‘स्पोर्टस् इंज्युरी ॲण्ड स्पोर्टस् न्युट्रिशियन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन येथील तरुणांनी केले. सत्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सुप्रसिद्ध फिजीओथेरीपिस्ट डॉ. केवीन अग्रवाल, प्रा.डॉ सूरज येवतीकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजू पारवे, जितू गिरडकर, कृष्णकुमार मिश्रा, डॉ. विवेक शाहू, वर्षा टोंग, प्रा. बेबी तांबे, प्रा. आरती खेवले, काजल मेंढे, स्नेहल सहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. गीता चाचरकर, संदीप गोंड, देवश्री लव्हे, दीपाली चाचरकर, हिमांशू बावनकर, पवन उराडे, प्राची बघेल, रितिक पारवे, आकाश मसराम , कनिझ शेख, किरण तळेकर, रश्मी नखाते, हर्षिता उपलपाटी, सृष्टी लुटे या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उमरेड, भिवापूर आणि कुही येथील खेळाडू हजर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रितेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन स्वप्निल गवळी यांनी केले. आभार राजेश भट यांनी मानले. ओम साई स्पाेर्टिंग क्लबचे प्रफुल्ल बेले, पंकज भिसीकर, गजानन ठाकरे, शंतनू चौबे, सौरभ भिवगडे, अजिंक्य कामडी, प्रणव भिसीकर, अमोल खोब्रागडे, नचिकेत सोलंकी, निखिल नेव्हारे, आकाश बनकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Athletes felicitated at Umred